शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

काकडगावी लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

By admin | Updated: October 12, 2015 23:52 IST

उपक्रम : पावसाने ओढ दिल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प

द्याने : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथे लोकसहभागातून धरणातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सुनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाने ओढ दिल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाली. हरणबारी पूरपाणी पोहोचले नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. गावाशेजारील धरणातून सरपंच नंदलाल आहिरे ग्रामस्थांनी काढ काढण्याचा निर्णय घेतला. धरणाची उंची वाढल्यास परिसरातील शेतीचा व पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे, असे प्रतिपादन सरपंच नंदलाल आहिरे यांनी केले.यावेळी जि.प. सदस्य सुनिता पाटील. पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, गटविकास अधिकारी बी. एम. बहिरम, मंडल अधिकारी विस्तार अधिकारी एस. एस. महाले, नामपूरचे सरपंच प्रमोद सावंत, किरण अहिरे, अशफाक पठाण, सी. पी. अहिरे, तलाठी डी. टी. साळवे, धीरज कापडणीस, सरपंच नंदलाल अहिरे, सदस्य विनोद पाटील, निंबा सोनवणे, संगीता गरूड, कुसुम अहिरे, ज्योत्स्रा पवार, स्ािंधुताई पाटील, पोलिस पाटील राजाराम पाटील, रामचंद्र अहिरे, देवराम अहिरे, महादू अहिरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य सुनिता पाटील यांनी शासनाच्या विविध योजना व पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविण्यात याव्यात, असे आवाहन केले. त्र्यंबकला धडक मोहीमत्र्यंबकेश्वर : त्र्यंबक तालुक्यात कृषी विभागातर्फे वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, ही मोहीम पंचसूत्री अभियानाअंतर्गत वसुंधरा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून निवडण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील इतर गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी दिली.उपविभागीय अधिकारी गोकुळ वाघ, अजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बंधारे बांधण्यात आले. या गावांमध्ये मेट चंद्राची, टाकेहर्ष, नांदगाव (कोहळी), वरस विहीर, टाकेदेवगाव, देवडोंगरा, पिंपळद, बेझे, चाकोरे, आळवंड, तोरंगण, वाघेरे, कोटंबी, गडदवणे आदि गावात नुकतेच वनराई बंधारे बांधण्यात आले. वनराई बंधारे बांधण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदिंनी प्रयत्न केले. तसेच यापुढेही असे बंधारे बांधण्यासाठी सर्व अधिकारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सूर्यवंशी यांनी दिली.दरम्यान, तालुक्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने ग्रामस्थांच्या श्रमदानाने सर्व कृषी सहायक यांनी तालुक्यात धडक मोहीम राबविली असल्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. बांधलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे डिसेंबरअखेर ओहळ, नाले यामध्ये पाणी टिकून राहणार आहे.(वार्ताहर)