शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘गुरपूरब’ सोहळ्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:25 IST

गुरू गोविंदसिंग यांच्या ३५३वी जयंतीनिमित्त गुरू गोविंदसिंग फाउंडेशनच्या स्थापना दिवसानिमित्त येथील खालसा एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये ‘गुरपूरब’ या तीन दिवस सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर्य समाजाचे विचारवंत व लेखक दौलत राय यांच्या नजरेतून ‘साहिबे कमाल गुरू गोविंदसिंग’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

ठळक मुद्देजयंती सोहळा : ‘साहिबे कमाल गुरू गोविंदसिंगजी’ पुस्तकाचे प्रकाशन

इंदिरानगर : गुरू गोविंदसिंग यांच्या ३५३वी जयंतीनिमित्त गुरू गोविंदसिंग फाउंडेशनच्या स्थापना दिवसानिमित्त येथील खालसा एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये ‘गुरपूरब’ या तीन दिवस सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर्य समाजाचे विचारवंत व लेखक दौलत राय यांच्या नजरेतून ‘साहिबे कमाल गुरू गोविंदसिंग’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.व्यासपीठावर गुरूगोविंदसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष गुरदेवसिंग बिर्दी, उपाध्यक्ष हरजितसिंग आनंद, सचिव बलबीरसिंग छाब्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदरसिंग उपस्थित होते.गुरू गोविंदसिंग फाउंडेशनचे सहसचिव सरदार हरबंससिंग घटौडे यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य सुभाष भावसार यांनी या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केला. पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील गुरु कुल प्रतिष्ठान आणि श्री संत नामदेव अध्यासनाचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ अभियंता दिलीप क्षीरसागर, प्राचार्य सुभाष भावसार, ग्यानी बलविंदरसिंग, गुरूगोविंदसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार गुरदेवसिंग बिर्दी यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन तेजश्री कुलकर्णी यांनी केले. रणजित सिंग आनंद यांनी आभार मानले. दरम्यान, गुरु गोविंदसिंग यांच्या ३५३वी जयंतीनिमित्त शनिवारी (दि. ११) अखंड नामस्मरण, व्याख्यान, विविध स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत, तर रविवारी (दि. १२) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मराठी भाषा संवर्धन सप्ताह सफलडॉ. अशोक कामत यावेळी म्हणाले, मराठी भाषा संवर्धन सप्ताह सुरू असताना जेव्हा गुरू गोविंदसिंग फाउंडेशनसारख्या शैक्षणिक संस्थेमध्ये मराठी पुस्तकाचे प्रकाशन होते तेव्हा तो सप्ताह सफल झाल्यासारखे वाटते. गुरु ग्रंथ साहिबमध्ये भारतातल्या सर्व संतांची वाणी समाविष्ट आहे. यात सात्विकता, धार्मिकता आहे जी भारताच्या सर्व समाजविकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम