शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कळवण शहरात घरोघरी सर्वेक्षण मोहीमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 01:00 IST

कळवण : कोरोनाचे ११ रु ग्ण आढळून आल्याने कळवण नगरपंचायत हद्दीअंतर्गत शहरात घरोघरी जाऊन आर. के. एम माध्यमिक विद्यालय, जानकाई विद्यालय, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह स्थानिक डॉक्टर, नगरपंचायत कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांकडून शनिवारी (दि.१८) घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यास सुरु वात झाली.

कळवण : कोरोनाचे ११ रु ग्ण आढळून आल्याने कळवण नगरपंचायत हद्दीअंतर्गत शहरात घरोघरी जाऊन आर. के. एम माध्यमिक विद्यालय, जानकाई विद्यालय, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह स्थानिक डॉक्टर, नगरपंचायत कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांकडून शनिवारी (दि.१८) घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यास सुरु वात झाली.कळवण शहरात खबरदारीचा उपाय म्हणून आमदार नितीन पवार, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांनी शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाची बैठक घेऊन शहर अंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करण्याची सूचना केली होती. सर्वेक्षण करणाºया यंत्रणेला नगरपंचायतकडून संरक्षण साहित्य, तपासणी साहित्य व साधन सामुग्री देण्यात आली. त्यानुसार ५० कर्मचाऱ्यांमार्फत रु ग्णांचे सर्वेक्षण करण्यास सुरु वात करण्यात आली.शहरातील नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन कळवणच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी महाले गटनेते कौतिक पगार, उपनगराध्यक्ष अतुल पगार यांनी केले आहे. आरोग्य सर्वेक्षणत कुटुंबातील कोणी रु ग्ण आढळल्यास त्याची नोंद आरोग्य विभागाकडे केली जाणार आहे. तसेच या रु ग्णांची तपासणी करून त्यांच्या सर्दी,खोकला याची तीव्रता बघून त्याला औषधे दिली जाणार आहेत.------------------सहा दिवस जनता कर्फ्यूकळवण शहरात गेल्या शुक्र वारपासून ६ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कळवण शहरातील सर्व व्यवहार ६ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गांधी चौक, मेनरोड परिसरातील भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाले असून तेथील रहिवाशांना बाहेर निघण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. संपूर्ण शहरात नगरपंचायतचे औषध फवारणी करण्याचे नियोजन असून घरोघरी आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे . दरम्यान, घरोघर जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी कळवण नगरपंचायतीच्या कर्मचाºयांची सतरा प्रभागात सतरा पथके तयार केली असून, पुढील सात दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण होईल असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक