संगमेश्वर : ऐन सणासुदीत मालेगाव महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा उशिरा झाल्याने संगमेश्वरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी सणाला संगमेश्वरात पाणी वितरणाचा दिवस होता. मात्र, या दिवशी तब्बल पाच तासांनी पाणीपुरवठा उशिरा करण्यात आल्याने ऐन सणासुदीत नागरिकांच्या हालात भर पडली. सकाळी नऊचे सुमारास संगमेश्वरात पाणीपुरवठा होतो; मात्र जलशुद्धीकरण केंद्रात वीजपुरवठा नसल्याने पाणी शुद्धीकरण उशिरा झाले. त्याचा फटका वितरणावर झाला. तब्बल पाच तास उशिरा पाणी आल्याने ऐन सणासुदीत नागरिकांचे हाल झाले. पाणीपुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून विशेषत: महिला वर्गाकडून होत आहे.
संगमेश्वरात सणासुदीत उशिरा पाणीपुरवठा
By admin | Updated: October 6, 2014 00:09 IST