शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडकडून उशिराने कांदा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:18 IST

लासलगाव : यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा नाफेडकडून होणाऱ्या कांदा खरेदीवरही परिणाम झाला. यावर्षी तब्बल एक महिना उशिराने लासलगाव बाजार समिती आवारात नाफेडने कांदा खरेदी सुरू केली. त्यातही नाफेडने नेमलेल्या एजन्सीला व्यापारी वर्गाने विरोध दर्शविल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, गुरुवारी (दि. ३) दुपारनंतर बंद पडलेले लिलाव पूर्ववत सुरू झाले असले तरी त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने कमी पुकारा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देलासलगाव : गतवर्षी ३१ हजार क्विंटल खरेदी

लासलगाव : यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा नाफेडकडून होणाऱ्या कांदा खरेदीवरही परिणाम झाला. यावर्षी तब्बल एक महिना उशिराने लासलगाव बाजार समिती आवारात नाफेडने कांदा खरेदी सुरू केली. त्यातही नाफेडने नेमलेल्या एजन्सीला व्यापारी वर्गाने विरोध दर्शविल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, गुरुवारी (दि. ३) दुपारनंतर बंद पडलेले लिलाव पूर्ववत सुरू झाले असले तरी त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने कमी पुकारा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ४ मे २०२० रोजी लासलगाव बाजार समितीतून कांदा खरेदी सुरू केली होती. ५ ऑगस्ट २०२० पर्यंत ३१ हजार ६९४ क्विंटल कांद्याची खरेदी होऊन कमाल ११८७ रुपये, किमान ५३२ रुपये तर सर्वसाधारण ९५० रुपये भाव मिळाला होता. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नाफेडमार्फत केंद्र सरकारची कांदा खरेदी तब्बल एक महिना उशिराने सुरू झाली. नाफेडने कांदा खरेदीसाठी दोन एजन्सी नेमल्या असल्याचा दावा संबंधित संस्थांकडून केला जाऊन लासलगाव बाजार आवारात कांदा खरेदी सुरू करण्यात आली; परंतु व्यापारी संघटनांनी त्यांना आक्षेप घेत लिलाव बंद पाडले. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, यंदा नाफेडकडून जास्तीत जास्त कांदा खरेदीवर भर देण्याचा निर्णय झाला असल्याने एजन्सीमार्फत सुरुवातीला विंचूर येथून तर गुरुवारी लासलगाव येथे कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली. नाफेडने ज्या ठिकाणी चाळी उभारल्या आहेत. तेथे जाणारा रस्ता पावसाळ्यात खराब होत असल्याने नाफेडने कांदा खरेदीसाठी घाई चालवली आहे.कोट...लासलगाव बाजार समितीत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे होतात. नाफेडने कांदा खरेदी सुरू केली यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी लिलावातून सहभाग काढून घेतल्याने कांद्याचे लिलाव बंद पडले. शेतकऱ्याला नाफेडकडून जास्त दर मिळणार असेल तर व्यापाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे होते.- पंकज जाधव, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :onionकांदाMarketबाजार