पाटणे : मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेकडून उशिरा अनुदान मिळत असून, आठवड्याला केवळ पाच हजार रुपये जिल्हा बॅँक शाखेकडून देण्यात येत असल्याने शेतकºयांत नाराजी व्यक्त होत आहे.चालू हंगामात सुरुवातीपासूनच खरीप पिके अतिशय जोमाने बहरली होती. पाऊस समाधानकारक होता दोन तीन वर्षांनंतर प्रथमच खरिपाचे पीक मोठ्या प्रमाणात मिळेल या आशेवर बळीराजा होता; परंतु चालू हंगामात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाल्याने आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या अवकाळी पावसाने अतिवृष्टीने खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळबागांनाही मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसून अतोनात नुकसान झाले.शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने अतिवृष्टीबाधित शेतकºयांना मदत जाहीर केली त्यात खरीप पिकासाठी आठ हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये त्यानुसार २ हेक्टरपर्यंत बाधित क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकºयांना अनुदान नुकतेच शासनाने शेतकºयांंच्या खात्यात जमा केले.पाटणे व परिसरातील शेतकºयांच्या खात्यात हे अनुदान १५ जानेवारी रोजी जमा करण्यात आले. त्यांचे वाटपही सुरू आहे. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालय येथून तालुक्यातील शाखेत आदेश देऊन बाधित शेतकºयांना फक्त आठवड्याला पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.शासनाने दिलेले अनुदान जिल्हा बँकेत शेतकºयांच्या खात्यात एकरकमी जमा करण्यात आले; परंतु बँक फक्त पाच हजार रुपये देत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये संताप होत आहे. रब्बी हंगामाच्या पीक लागवडीसाठी पाटणे परिसरातील शेतकºयांना पैशाची गरज असताना खात्यात जमा असलेल्या रक्कमेचा वापर करता येत नसल्याची शेतकºयांची तक्रार आहे.शासनाने अतिवृष्टीचे अनुदान संपूर्ण दिले असता जिल्हा बँक शेतकºयांना देत नाही. आधीच नैसर्गिक आपत्तीने घायाळ झालेल्या शेतकºयांना तात्काळ संपूर्ण अनुदानाची रक्कम शेतकºयांना मिळावी, अशी मागणी पाटणेसह परिसरातील शेतकºयांनी केली आहे.वडनेरच्या शेतकºयांचे प्रांताधिकाºयांना निवेदनवडनेर : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून शासनाने दिलेला दुष्काळ अनुदान निधी देण्यास विलंब होत असून, एकावेळेस फक्त पाच हजार रुपये दिले जात आहेत. यासाठी परिसरातील गाव खेड्याकडून येणाºया शेतकºयांना वडनेर येथील बँकेत दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. वडनेर येथील बँकेत काटवण परिसरातील मोठ्या संख्येने खातेदार आहेत. शेतीची कामे बुडवत दिवसभर थांबूनदेखील पैसे मिळत नसून, रिकाम्या हाती परतावे लागत आहे. यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. यासाठी तात्काळ संबंधितांनी लक्ष घालून अनुदानाची पूर्ण रक्कम एका वेळेस पूर्ण मिळावी यासाठी विराणेचे माजी सरपंच नंदकुमार सोनवणे यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना निवेदन दिले आहे. निवेदनाची प्रत तहसीलदार, सोसायटी सभापती, जिल्हा बँक वडनेर शाखा व वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यास देण्यास आली आहे. निवेदनावर विराणेचे नंदकुमार सोनवणे, सतीश पगार, हिरालाल पगार, दावल माळी, ज्ञानेश्वर पगारे आदींच्या सह्या आहेत.
अनुदानास उशीर; शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:17 IST
मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेकडून उशिरा अनुदान मिळत असून, आठवड्याला केवळ पाच हजार रुपये जिल्हा बॅँक शाखेकडून देण्यात येत असल्याने शेतकºयांत नाराजी व्यक्त होत आहे.
अनुदानास उशीर; शेतकरी संतप्त
ठळक मुद्देपाटणे : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याची तक्रार