शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलांचे उशिरा वाटप; पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:18 IST

ना रीडिंग, ना वीज बिल पण तीन महिन्यांचे घरगुती व व्यावसायिक वापराचे वीज बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची तंबी देणारा एक कलमी कार्यक्रम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतल्याने आडगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले

आडगाव : ना रीडिंग, ना वीजबिल पण तीन महिन्यांचे घरगुती व व्यावसायिक वापराचे वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची तंबी देणारा एक कलमी कार्यक्रम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतल्याने आडगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. चार महिन्यांपासून वीज बिल मिळत नाही, शिवाय रीडिंग कर्मचाºयांच्या सोयीने घेतले जात असल्यामुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याने नागरिक संतप्त आहेत.वीज वापराबाबत ग्राहकांना अवगत करण्यासाठी मीटरचा व वापरलेल्या रीडिंगचा फोटो असलेले वीज बिल देण्याची पद्धत ग्राहकांना संभ्रमात टाकत असून, महावितरणद्वारे देण्यात येणाºया बिलांवरील फोटो हे अस्पष्ट असल्याने नागरिकांना नेमके किती वीज वापरले याचा उलगडा होत नसल्याने महावितरणच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. शिवाय काही वीज बिलांचे तर फोटोच काढलेले नसल्याने फोटोची जागा रिक्त असलेले वीज बिल पाठवले जात आहे. महावितरण आपल्या चुका झाकण्यासाठी नवनवीन प्रयोग करत ग्राहकांची लूट करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तीन ते चार महिन्यांपासून वीज बिल नियमित मिळत नाही. शिवाय अंदाजे बिलांमुळे ग्राहकांचा संभ्रम वाढत आहे. आॅनलाइन बिल भरणाºया लोकांना बिल मिळाले नसल्याने किती युनिटचे बिल आहे, याचा अंदाज येत नाही. याबाबत महावितरण कार्यालयात विचारणा केली असता थोडे अ‍ॅडजेस्ट करून घेण्याचा सल्ला देऊन बिल काढून दिले जात आहे. पण महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. फोटो नसल्यामुळे रीडिंग किती, वीज बिल किती याची माहिती ग्राहकाला मिळत नाही. त्यामुळे एका महिन्याचे बिल कमी येते आणि दुसºया महिन्यात वाढीव युनिटच्या दराने वीज बिल भरावे लागते. शिवाय त्यात सुधारणा करण्यासाठीदेखील ग्राहकांना महावितरण कार्यालय, मुख्य कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. बिल भरले नसल्यास तत्काळ कनेक्शन बंद केले जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.कर्मचाºयांच्या सोयीने मीटर रीडिंगवीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी देत असल्याने आडगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. चार महिन्यांपासून वीज बिल मिळत नाही, शिवाय रीडिंग कर्मचाºयांच्या सोयीने घेतले जात असल्यामुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल