शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत महापालिका लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:56 IST

महापालिकेच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत परिसरातील ८०हून अधिक बेशिस्त नागरिकांवर एप्रिल व मे महिन्यात घनकचरा अधिनियम अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने दोन महिन्यांत पंचवटी महापालिका लखपती झाली आहे.

पंचवटी : महापालिकेच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत परिसरातील ८०हून अधिक बेशिस्त नागरिकांवर एप्रिल व मे महिन्यात घनकचरा अधिनियम अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने दोन महिन्यांत पंचवटी महापालिका लखपती झाली आहे.पंचवटी घनकचरा विभागाच्या पथकामार्फत स्वच्छता पाहणीदरम्यान अस्वच्छता कचरा वर्गीकरण न करणारे नागरिक, प्लॅस्टिक कॅरिबॅग वापर व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  यामध्ये अस्वच्छता पसरवणाºया ३८ नागरिकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून सुमारे ४३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर प्लॅस्टिकचा वापर व  विक्री करणाºया नऊ जणांकडून ८० किलो प्लॅस्टिक जप्त करत ४५  हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.कचरा वर्गीकरण करणाºया दहा नागरिकांकडून पाच हजार रुपये तर रामकुंड परिसरात अस्वच्छता पसरवणाºया ६६ बेशिस्त नागरिकांवर कारवाई करत ६६०० रुपये दंड वसूल केला आहे. याशिवाय उघड्यावर शौच करणाºया एका व्यक्तीवर कारवाई करून त्याच्याकडून पाचशे रुपये असा एकूण एक लाख १८० रुपयांचा दंड बेशिस्त नागरिकांकडून वसूल केला आहे.महापालिका उपायुक्त सचिन हिरे, पंचवटी विभाग अधिकारी  राजेंद्र गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, दुर्गादास माळेकर, सिद्धार्थ रामवंशी,  रशीद शेख, किरण मारू, दीपक चव्हाण, उदय वसावे, संजय तिडके, विनय रेवर आदींनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक