शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर गोदामाईचा श्वास होऊ लागला मोकळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:56 IST

गोदावरीच्या काठाभोवती २००२ साली कॉँक्रीटीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तसेच मागील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरदेखील टाळकुटेश्वर पुलापासून पुढे नदीच्या डाव्या-उजव्या तटाभोवती कॉँक्रीटच्या घाटांचा विस्तार थेट लक्ष्मीनारायण पुलापासून पुढे गोदावरी-कपिला संगमापर्यंत करण्यात आला.

ठळक मुद्देनदीपात्र कॉँक्रीटीकरणमुक्त मोहिमेला ‘मुहूर्त’दुतोंड्या मारूती पासून प्रारंभ

नाशिक :गोदावरी नदीपात्रात थेट रामकुंडापासून तर तपोवनापर्यंत तटाभोवती करण्यात आलेल्या कॉँक्रीटीकरणामुळे गोदावरीचे नैसर्गिक जलस्त्रोत संपुष्टात आले आणि नदी परावलंबी होत गेली. गोदा कॉँक्रीटमुक्त करण्याचा लढा हा थेट न्यायालयापर्यंत पोहचला. परिणामी महापालिकेने आता स्मार्टसिटीअंतर्गत ‘प्रोजेक्ट गोदा’ अभियानाद्वारे नदीपात्रातील कॉँक्रीटचे घाट फोडण्यास सुरूवात केली आहे.गोदावरी नदीचा कॉँक्रीटीकरणाद्वारे आवळलेला फास तत्काळ मोकळा करावा यासाठी गोदाप्रेमी सेवा समिती, आपलं पर्यावरण, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, नमामी गोदा अशा विविध संघटनांकडून गोदा कॉँक्रीटीकरणमुक्तीचा रेटा प्रशासनाकडे लावण्यात आला. अखेर मनपा प्रशासनाने सोमवारी (दि. ८) गोदा प्रोजेक्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात कामाला सुरूवातदेखील करण्यात आली.

गोदावरीच्या काठाभोवती २००२ साली कॉँक्रीटीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तसेच मागील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरदेखील टाळकुटेश्वर पुलापासून पुढे नदीच्या डाव्या-उजव्या तटाभोवती कॉँक्रीटच्या घाटांचा विस्तार थेट लक्ष्मीनारायण पुलापासून पुढे गोदावरी-कपिला संगमापर्यंत करण्यात आला. यावेळी विविध पर्यावरणप्रेमी संघटनांनी या कॉँक्रीट घाट विस्तारीकरणाला तीव्र विरोधदेखील दर्शविला होता. यामुळे नदीकाठावरील जैवविविधता संपुष्टात आलीच मात्र घाटांची स्वच्छता राखण्यास प्रशासनाला अपयश आल्याने नदीच्या प्रदूषणात मोठी भर पडली. यामुळे नदीचे तट संवर्धन धोक्यात सापडले. यामुळे नदीप्रमींसह पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कॉँक्रीटीकरणमुक्तीचा ‘श्रीगणेशा’ झाल्यामुळे आता मात्र गोदावरी पुर्नर्जिवित करण्याच्यादृष्टीने महापालिकेने उशिरा का होईना ठोस पाऊल उचलले असे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले....या प्राचीन कुंडांना फुटणार पाझरदक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातील कॉँक्रीटीकरण तोडण्यास सुरूवात झाल्याने आता कॉँक्रीटीकरणाखाली दाबले गेलेले प्राचीन कुं ड मोकळे होणार आहे. पहिल्या टप्प्यात अनामिक, पाचकुं ड, दशाश्वमेघ, रामगया, पेशवे, खंडोबा कुं ड पुर्नजिवित होण्यास मदत होणार आहे. नदीपात्रात एकूण १७ प्राचीन कुंड आहेत.

टॅग्स :godavariगोदावरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका