शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीचे चार वर्षांपासून हजारो कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:25 IST

जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये सन २०१५-१६ या वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे समाजकल्याण खात्याकडून सुरू करण्यात आले होते. या कामांपैकी १३२६ कामे चार वर्षांनंतरही अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपंधरा कोटी परत जाणार : विकासकामांवर होणार परिणाम दलित वस्तीतील अपूर्ण कामे पूर्ण कशी करायची

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वसाहतीत रस्ते, पाणी, गटार व दिव्यांची सोय करणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामांपैकी सुमारे १,३२६ कामे गेल्या चार वर्षांपासून रखडली असून, सदर कामे करणा-या ठेकेदारांनीही अपूर्ण कामे करून काही कामांचे देयकेही काढून घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जी काही कामे अपूर्ण आहेत त्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदीची सुमारे १५ कोटींची रक्कम आता शासनजमा करावा लागणार असल्याने दलित वस्तीची कामे पूर्ण कशी करावी? असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये सन २०१५-१६ या वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे समाजकल्याण खात्याकडून सुरू करण्यात आले होते. या कामांपैकी १३२६ कामे चार वर्षांनंतरही अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे. या कामांसाठी करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीपैकी ९० टक्के रक्कम ठेकेदारांना अदा करण्यात आली असून, उर्वरित १० टक्केम्हणजेच १५ कोटी रक्कम समाजकल्याण विभागाकडे चार वर्षांपासून पडून आहे. सदरची रक्कम खर्च करण्याची मुदतही संपुष्टात आली असल्यामुळे ही रक्कम शासनाकडे परत करण्याशिवाय कोणताही पर्याय नसला तरी, दलित वस्तीतील अपूर्ण कामे पूर्ण कशी करायची व त्यासाठी निधीची उपलब्धता कोठून करायचा? असा प्रश्न समाजकल्याण समिती सभापतींसमोर उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या समाजकल्याण समितीच्या मासिक बैठकीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समितीच्या सदस्यांनी समाजकल्याण अधिकारी व कर्मचाऱ्यांना यासाठी दोषी ठरवून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सन २०१५-१६ मध्ये सरकारने दलित वस्ती सुधार योजनेसाठी दिलेला निधी पूर्ण खर्च न झाल्याने उर्वरित १५ कोटी रुपये शासनाकडे परत पाठविण्याची वेळ समाजकल्याण विभागावर आलेली असताना आता ७०१ कामांचे उर्वरित १० टक्के रक्कमेचे देयके परत मिळावे यासाठी ठेकेदारांनी प्रस्ताव दिले आहेत. त्यापोटी समाजकल्याण विभागाला सात कोटी रुपयांचे दायित्व आहे. एकीकडे पैसे परत करण्याचे तर दुसरीकडे सात कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करण्याचे काम समाजकल्याण विभागाला करावे लागणार आह

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद