शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नामांकनासाठी आज अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:44 IST

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना सोमवारी (दि. ८) शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी अनुक्रमे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केले.

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना सोमवारी (दि. ८) शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी अनुक्रमे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केले. त्याचबरोबर बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार, बापू बर्डे या दोघांनीही शहरातून रॅली काढून अर्ज दाखल केले. दिवसभरात दोन्ही मतदारसंघातून बारा नामांकन दाखल करण्यात आले असून, मंगळवारी (दि.९) अंतिम दिवस आहे.जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २ एप्रिलपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली असून, उमेदवारी दाखल करण्यास एक दिवसाचा कालावधी बाकी असताना सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीतून डॉ. भारती पवार यांनी रॅलीने जाऊन दुपारी २ वाजेच्या दरम्यान आपले नामांकन दाखल केले. रॅलीत पालकमंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, राहुल आहेर यांच्यासह सेना-भाजपाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. याचबरोबर वंचित आघाडीचे पवन पवार व दिंडोरीतून बापू बर्डे या दोघांनीही रॅली काढून आपले नामांकन दाखल केले. तसेच नाशिकमधून प्रकाश गिरीधर कनोजे, सुधीर श्रीधर देशमुख, बाजीराव (करण) पंढरीनाथ गायकर, देवीदास पिराजी सरकटे यांनी, तर दिंडोरीतून माकपाचे उमेदवार जिवा पांडू गावित यांनी पुन्हा अर्ज दाखल केला. याशिवाय, माकपाकडून हेमंत वाघेरे, बसपाचे अशोक त्र्यंबक जाधव व अपक्ष गाझी ऐतजाद खान यांनी देखील अर्ज दाखल केले. गेल्या चार दिवसांत नाशिक मतदारसंघातून दहा उमेदवारांनी बारा, तर दिंडोरीतून सात उमेदवारांचे १५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येणार आहे.उत्तर महाराष्टत युतीत कोणीही बंडखोर नाही, जे नाराज आहेत, त्यांच्याशी मुख्यंमत्री व प्रदेशाध्यक्ष संपर्क साधून असून, त्यांच्याशी बोलणी चालू आहे. त्यामुळे लवकरच नाराजांची समजूत काढण्यात येईल.  - गिरीश महाजन, पालकमंत्रीभारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा भाजपाचा नसून संपूर्ण देशाचा आहे. भाजपाशी काही प्रश्नांवर मतभेद होते, परंतु अनेक विषयांवर सहमती झाल्याने आता आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत.  - संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा