शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या दिवशी भक्तांची उसळली गर्दी : ‘पुढच्या वर्षी लवकर या...,’ अशी भक्तांकडून साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:09 IST

गणेशोत्सवाचा समारोप मंगळवारी होणार असून पूर्वसंध्येला भक्तांचा जनसागर शहरात पहावयास मिळाला. भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने रस्ते फुलले होते.

नाशिक : आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि.४) अखेरच्या दिवशी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. सार्वजनिक मंडळांचे देखावे, आरासचा नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.गणेशोत्सवाचा समारोप मंगळवारी होणार असून पूर्वसंध्येला भक्तांचा जनसागर शहरात पहावयास मिळाला. भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने रस्ते फुलले होते. कोटी कोटी रूपे तुझी..., आला आला माझा गणराज आला... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी दुमदुमलेल्या वातावरणात भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेतले. बारा दिवसांपासून शहरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झालेली पहावयास मिळत आहे; मात्र हे वातावरण उद्या संपुष्टात येणार आहे. विसर्जनाचा जल्लोष करत बाप्पाला भावपूर्ण निरोप देत ‘पुढच्या वर्षी लवकर या...,’ अशी साद भक्तांकडून घातली जाणार आहे.संध्याकाळपासून बी. डी. भालेकर मैदान, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, शालिमार, पंचवटी कारंजा, मेनरोड, भद्रकाली, जुने नाशिकसह उपनगरीय परिसरात विविध सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त उभारलेले देखावे, आरास तसेच बाप्पांच्या एकापेक्षा एक देखण्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. भालेकर मैदानाकडे जाणाºया सर्व वाटांवर दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. शालिमार, सीबीएस-कान्हेरेवाडी, अण्णा भाऊ साठे चौक या परिसरात बॅरिकेड लावून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.