लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी ११०० क्यूसेकने गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार असून, त्यामुळे कसमादे पट्ट्यातील कळवण शहरासह ५२ पाणीपुरवठा योजनांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांना चणकापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी असल्यामुळे जिल्हाधिकारी यांना सकारात्मक अहवाल पाठवून पाणी सोडण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी केली होती. चणकापूर प्रकल्पातून कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातील व गिरणा नदीकाठावरील गावे व मालेगाव महानगरपालिका, सटाणा नगर परिषद, कळवण नगरपंचायत व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी व कसमादेतील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कसमादेसाठी वरदान ठरलेले चणकापूर धरण शेतकऱ्यांसाठी यंदा चांगलेच लाभदायी ठरले. दशकानंतर धरणातून सिंचनासाठी दोन आवर्तने मिळाली. पिण्यासाठीचे शेवटचे आवर्तन बुधवारी सोडण्यात येणार आहे.आवर्तनानंतरही राहणार पाणीसाठा शिल्लक धरणात बºयापैकी जलसाठा आहे. मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये निम्मा जलसाठा शिल्लक आहे. गिरणा नदीपात्र ओले असल्याने आवर्तनासाठी पाणी कमी लागू शकेल. शेवटच्या आवर्तनानंतरही अडीचशे ते तीनशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा धरणात शिल्लक राहणार आहे. चणकापूर धरणावर कसमादेतील मालेगावसह लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नोव्हेंबरपर्यंत पूरपाणी पाणीपुरवठा योजनांना मिळत राहिले. त्यामुळे धरणातील पहिले आवर्तन सोडण्याची गरज फेब्रुवारीमध्ये निर्माण झाली. यामुळे आवर्तनाची संख्या चारवरून तीन झाली.
चणकापूरमधून आज अखेरचे आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:39 IST
कळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चणकापूरमधून आज अखेरचे आवर्तन
ठळक मुद्देदिलासा : कळवणसह ५२ पाणी योजनांना होणार लाभ