लासलगाव : दक्षिणेकडील राज्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातही कांदा आवक घटल्याने येथील बाजार समितीत सोमवारी तीनशे रूपयांची तेजी होऊन ५६९७ रूपये सर्वाधिक भाव जाहीर झाला. सोमवारी १०४ वाहनातील १०५७ क्विंटल कांदा किमान २९२५ ते कमाल ५६९७ व सरासरी ५३५१ रूपये भावाने विक्र ी झाला. लासलगावला येत्या एक दोन दिवसात आवक कमी झाली तर कांदा विक्र ी सहा हजार रूपये प्रतिक्विंटल भावाने होण्याची शक्यता आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी या हंगामात निच्चांकी कांदा आवक शनिवारी झाली. २ नोव्हेंबर रोजी या हंगामात कांदयाने सर्वाधिक ५३६९ भाव जाहीर झाला. या हंगामात दि. १९ सप्टेंबर रोजी ५१०० रूपये भाव कांदा आवक कमी झाल्याने येथील बाजारपेठेत जाहीर झाला होता.तो ओलांडून हा सोमवारी सर्वात जास्त भाव जाहीर झाला.
लासलगावी कांदा दरात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 12:53 IST