शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

लासलगावी कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:01 IST

लासलगाव: निफाड तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार धुमाकूळ घातल्याने आरोग्य व महसूल यंत्रणा गतिमान झाली असून मंगळवारी सकाळपासून दुकाने कडकडीत बंद असल्याने लॉकडाऊनची प्रचिती आली.

ठळक मुद्देलासलगावमध्ये आज बंदमुळे शुकशुकाट

लासलगाव: निफाड तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार धुमाकूळ घातल्याने आरोग्य व महसूल यंत्रणा गतिमान झाली असून मंगळवारी सकाळपासून दुकाने कडकडीत बंद असल्याने लॉकडाऊनची प्रचिती आली.एरवी कांदा व्यापाराने गजबजलेले असणाऱ्या लासलगावमध्ये आज बंदमुळे शुकशुकाट दिसून आला. आज लासलगावी कांदा लिलावात कोरोना उपाययोजना करीत लिलाव सुरू होते. कालच सरपंच जयदत्त होळकर, ज्येष्ठ सदस्य नानासाहेब पाटील, उपसरपंच अफजलभाई शेख, सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने व व्यवहार बंद असल्याचे दिसून आले.निफाड तालुक्यातील दोन्ही कोविड उपचार केंद्रात रुग्णांची संख्या वाढल्यामुळे बेड्स पूर्ण झाले आहेत. दररोज तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी संसर्ग होऊ नये यासाठी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असे आवाहन निफाड तालुका गटविकास अधिकारी संदीप कराड व कोरोना संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी केले आहे.निफाड तालुक्यातील सध्या १,८२८ रुग्ण असून निफाड तालुका पहिल्या क्रमांकावर आहे.निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे यांनी तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्यासह अधिकाऱ्यांनी बेफिकिरी दाखविणाऱ्या नागरिकांना व दुकान मालकांना दंड केल्याने त्याचा परिणाम निफाड तालुक्यातील विविध गावात झाला आहे.दरम्यान, आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १०९ वाहनातून उन्हाळ कांद्याची आवक अंदाजे २०५० क्विंटल होती तर १,०३२ वाहनातील लाल कांद्याची आवक अंदाजे १५,४०० क्विंटल होती. उन्हाळ कांदा किमान ७५१, कमाल १,१३१ व सरासरी १,००१ रुपये तरलाल कांदा किमान ३०० ते कमाल ९७० व सरासरी ७५१ रुपयांपर्यंत भाव होते.

टॅग्स :Governmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या