लासलगाव : येथील विंचुर रस्त्यावर असलेल्या साईबाबा ट्रेडिंग कंपनीचे गोदामास शुक्रवारी (दि.९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने, आतील कांदा व बारदानासह कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.लासलगाव येथील निर्यातदार कांदा व्यापारी कांतीलाल सुराणा यांचे लासलगाव-विंचूर रोडवर कांद्याचे मोठे गोदाम असून, त्या ठिकाणी ठेवलेले लाखो रुपयांचे बारदान आगीत जळून खाक झाल्याची घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. ही आग इतकी भीषण होती की, धुराचे मोठमोठाले लोळ उठत होते. यावेळी मजूर वर्गाला आगीतून बाहेर काढण्यात यश आले.
लासलगावी कांदा गुदामास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 02:05 IST