शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ काही दिवसांत देशातले सर्वांत मोठे ‘कोरोना हॉस्पिटल’ सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 00:31 IST

संपूर्ण जग कोरोना व्हायरस आणि आपापल्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत असताना भारतातील ओडिशा या राज्यानेही त्यासाठी आपली कंबर कसली असून, देशातील सर्वात मोठे आणि एक हजार खाटांचे पहिले ‘कोरोना हॉस्पिटल’ तयार केले आहे. अत्यंत बिकट अशा नैसर्गिक आपत्तींशी झुंजताना उल्लेखनीय कार्य केल्यानंतर आता केवळ काही दिवसांत तयार केलेल्या या हॉस्पिटलमुळे ओडिशा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

ठळक मुद्देओडिशा सरकारची कामगिरी : एक हजार खाटांचे देशातील पहिले सुसज्ज रुग्णालय

समीर मराठे ।नाशिक : संपूर्ण जग कोरोना व्हायरस आणि आपापल्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत असताना भारतातील ओडिशा या राज्यानेही त्यासाठी आपली कंबर कसली असून, देशातील सर्वात मोठे आणि एक हजार खाटांचे पहिले ‘कोरोना हॉस्पिटल’ तयार केले आहे. अत्यंत बिकट अशा नैसर्गिक आपत्तींशी झुंजताना उल्लेखनीय कार्य केल्यानंतर आता केवळ काही दिवसांत तयार केलेल्या या हॉस्पिटलमुळे ओडिशा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.हे ‘कोरोना हॉस्पिटल’ तयार असून, येत्या आठ-दहा दिवसांत कोरोना पेशंट्सच्या वापरासाठी ते संपूर्णपणे सज्ज असेल अशी व्यवस्था ओडिशा प्रशासन, तसेच तिथल्या गृह आणि आरोग्य खात्याने करून ठेवली आहे. यासंदर्भात ओडिशातील प्रशासकीय अधिकारी श्यामलकुमार दास यांनी सांगितले, भुवनेश्वर येथील ‘सम’ (शिक्षा ओ अनुसंधान) आणि ‘किम’ (कलिंगा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस) या वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटलचे रुपांतर तातडीने ‘कोरोना हॉस्पिटल’मध्ये करण्यात आले आहे. अत्यावश्यक ती सारी साधनसामग्री तिथे बसविण्यात आली असून, कोरोनासंदर्भातील सर्व आधुनिक उपचार येथे होऊ शकतील. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या पुढाकारानंतर त्वरित पावले उचलण्यात आली आणि दोन त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आले. त्यानुसार हे हॉस्पिटल आकाराला आले. ते आणखी सुसज्ज करण्यासाठी इतरही राज्यांनी मदत करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री पटनाईक यांनी केले आहे. वारंवार येणारी चक्रीवादळे, पूर, भूकंप.. यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेले ओडिशा राज्य देशातील ‘मागास’ राज्य समजले जात असले तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत मात्र या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो. आपत्ती व्यवस्थापनातील देशातील सर्वोत्तम यंत्रणा ओडिशाकडे आहे.ओडिशामध्ये नुकत्याच आलेल्या फोनी चक्रीवादळात ओडिशा प्रशासनाने किनारपट्टीवरील १४ जिल्ह्यांतील तब्बल १५ लाख नागरिकांना केवळ २४ तासांच्या आत सुरक्षित जागी हलवले होते. हा एक विक्रम मानला जातो आणि त्याबद्दल जगातील विकसित देशांनी, अगदी संयुक्त राष्टÑसंघानेही ओडिशाची पाठ थोपटली होती. आताही ‘कोरोना’च्या साथीतून वाचण्यासाठी पहिले पाऊल उचलताना ओडिशाने देशातील सर्वांत मोठे ‘कोरोना हॉस्पिटल’ केवळ काही दिवसांत सज्ज केले आहे..एक हजार खाटा तयारभुवनेश्वर येथील ‘सम’ रुग्णालयात ५०० खाटा आणि ‘आयसीयू’ची व्यवस्था‘किम’ रुग्णालयात ४५० खाटा आणि इतर व्यवस्थागरजेनुसार त्यात वाढही करता येईल.सीएसआर निधीतून व्यवस्था‘ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन’ (ओएमसी) आणि ‘महानदी कोलफिल्ड लिमिटेड’ (एमसीएल) यांनी निधी पुरवला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल