हनुमानवाडी : मंगळवारी दुपारी दहावीचा पेपर सुटल्यानंतर घारपुरे घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती़ रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याने सुमारे एक तास ही वाहतूक कोंडी कायम होती़ दरम्यान, यावेळी उपस्थित असल्याने पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविणे गरजेचे असताना वाहनात बसणे पसंत केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली़ दहावीचा पेपर सुटल्यानंतर पालक आपल्या मुलांसोबत अशोकस्तंभाकडून घरी जात असताना ही कोंडी झाली़ सुमारे तासाभरानंतर ही वाहतूक कोंडी दूर झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला़ (वार्ताहर)
घारपुरे घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
By admin | Updated: March 4, 2015 01:46 IST