वैतरणानगर : गेल्या दोन दिवसांपासून अप्पर वैतरणा धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून, धरण क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. जून व अर्धा जुलै महिन्याने गतवर्षी पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे शेतीचे कामेही मंदावली होती, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे १२ टीएमसी क्षमता असणारे सर्वात महत्त्वाचे धरण अप्पर वैतरणा असून, गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने, धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ होत असल्याने, मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी भातरोपांची पेरणी केली होती. मात्र, पावसाने तब्बल दीड महिना हुलकावणी दिली. दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने आवणीच्या कामाला वेग आला असून, शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. अप्पर वैतरणा धरण पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, पावसाळ्यामध्ये अनेक धबधब्यांवर पर्यटक गर्दी करत असतात. दरम्यान, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिक, मुंबई येथून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
-----------------------
अप्पर वैतरणा धरण
पाणी पातळी : ५९३.७५ मी.
उपयुक्त पाणीसाठा: ७०.७९ द.ल.घ.मी.
एकूण पाणीसाठा: ९३.४४ द.ल.घ.मी.
टक्केवारी: २१.४० टक्के
आजचा पाऊस: ८६ मिमी.
एकूण पाऊस: ७६४ मिमी.
विद्युत गृहातून सोडलेला विसर्ग- 00 क्युसेक्स
अतिरिक्त समांतर कालव्यातून सोडलेला विसर्ग - 00 क्युसेक्स
सांडव्यावरून सोडण्यात आलेला विसर्ग- 00 क्युसेक्स
---------------------
फोटो - अप्पर वैतरणा धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली वाढ. (छायाचित्र - समाधान कडवे) (२१ वैतरणा)
210721\21nsk_7_21072021_13.jpg
२१ वैतरणा