शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमिनीची मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 17:38 IST

नायगाव : प्रस्तावित महत्त्वाकांक्षी नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्षात भूसंपादन मोजणीला सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात सुरुवात झाली ...

नायगाव : प्रस्तावित महत्त्वाकांक्षी नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्षात भूसंपादन मोजणीला सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात सुरुवात झाली आहे. परिसरातील बहुतांश बागायती क्षेत्रातून सुमारे तीनशे मीटर अंतराचे संपादन केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गेल्या काही दिवसांपासून गती मिळाली आहे. सध्या या मार्गासाठी लागणाऱ्या क्षेत्राच्या संपादनास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि. ४) नायगाव खोऱ्यातील देशवंडी, जायगाव व वडझिरे शिवारात मोजणी करून दिशादर्शक (पोल) लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या तीनही गावातील शिवारात काही ठिकाणी तीनशे, तर काही ठिकाणी दोनशे फूट क्षेत्र संपादन होणार आहे.नायगाव खोऱ्यातील या गावातील बहुतांश क्षेत्र हे बागायती असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रस्तावित मार्गापासून तीन किलोमीटर अंतरावरून नायगाव शिवारातून आधीही परिसरातून गुळवंच येथील औष्णिक वीज केंद्रासाठी, इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झाले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या मार्गातील बागायती क्षेत्र वगळण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.-------------------असा राहणार प्रस्तावित रेल्वेमार्गपुणे, हडपसर, वाघोली, कोलवडी, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जबुत, साकूर, अंबोरे, संगमनेर, देवठाण, दोडी, सिन्नर, मुढारी, शिंदे आणि नाशिक रोड असा नवीन रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला आहे. २३५ किलोमीटर अंतराच्या या रेल्वेमार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुमारे १,३०० हेक्टर जमीन संपादन केली जाणार आहे. भांबुरवाडी, जैदवाडी (ता. खेड), नांदूर, विठ्ठलवाडी (ता. आंबेगाव), नगदवाडी, संतवाडी (ता. जुन्नर), नांदूर खंदारमाळ, साकूर, बांबळेवाडी, रणखांबवाडी, नांदूर शिंगोटे, सुंदरपूर असे २०.६२ कि. मी. लांबीचे एकूण १२ बोगदे (टनेल) बांधण्यात येणार आहेत. मुळा - मुठा, इंद्रायणी, भामा, भीमा, घोड, मीना, कुकडी, कास, मुळा, प्रवरा, दारणा आदी नद्यांवर मिळून १५ पूल बांधण्यात येणार आहेत. यापैकी सर्वात मोठा २५० मीटर लांबीचा पूल मुळा - मुठा नदीवर बांधण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक