शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

नांदगावची ‘ती’ जमीन मूळ मालकाला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:25 IST

नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यहारातील कथित घोटाळ्यात उच्च न्यायालयाने जमीनमालकाच्या बाजूने कौल दिल्यामुळे या संदर्भात दीड वर्षापूर्वी शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून रकमेचा अपहार केल्याचा दावा करीत नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई गोत्यात आली आहे.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यहारातील कथित घोटाळ्यात उच्च न्यायालयाने जमीनमालकाच्या बाजूने कौल दिल्यामुळे या संदर्भात दीड वर्षापूर्वी शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून रकमेचा अपहार केल्याचा दावा करीत नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई गोत्यात आली आहे. जमीनमालकाने जमिनीच्या एकूण किमतीच्या ५० टक्के रक्कम नजराणा भरून व्यवहार कायदेशीर करून घ्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.  जानेवारी २०१६ मध्ये या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तब्बल २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नवीन शर्तींच्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराला विभागीय आयुक्तांची अनुमती घेणे आवश्यक असताना नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी आपल्या अधिकारात परवानगी दिली होती. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील कासारी, वसंतनगर आदी गावात नवीन शर्तींच्या जमिनींचे सुमारे ५२ व्यवहार नोंदविले गेले होते. या सर्व व्यवहारांना तत्कालीन अपर जिल्हाधिकाºयांनी बेकायदेशीर ठरवून सदरची जमीन सरकार जमा केली होती, तर एका व्यक्तीच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने या साºया व्यवहारात सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा शासनाचा नजराणा बुडवून नुकसान केल्याचे व या रकमेचा महसूल अधिकाºयांनी अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. जमिनींच्या या व्यवहाराची सारी बाब महसूल खात्याच्या अखत्यारितील असतानाही लाचलुपत प्रतिबंधक खात्याने त्यात हस्तक्षेप केल्याची बाब प्रचंड गाजली होती व महसूल अधिकाºयांनी कामबंद आंदोलनही छेडले होते. याच प्रकरणातील दादा हरी शिंदे यांनी नवीन शर्तीची जमीन श्रीमती नमुबाई भीमा चव्हाण यांना विक्री केली होती व अपर जिल्हाधिकाºयांनी सदरची जमीन सरकारजमा केली होती. या कारवाईच्या विरोधात नमुबाई चव्हाण यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी होऊन न्यायालयाने विभागीय आयुक्तांना जमीन महसूल अधिनियमान्वये कार्यवाही करण्याचे आदेश दिले. चव्हाण यांनी जमिनीचा नजराणा भरण्याची तयारी दर्शविल्याने मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी या संदर्भातील आदेश पारित करून जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सणसणीत चपराक बसली असून, त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरदेखील या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी बोलून दाखविली आहे.सव्वा वर्ष उलटूनही दोषारोप नाहीलाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नांदगावच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी महसूल खात्यातील प्रांत, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व जमीनमालक अशा सुमारे २२ जणांविरुद्ध जानेवारी २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील सर्व संशयितांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या अटी, शर्तीनुसार संशयितांनी चौकशीत सारे कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे सादर केलेले असतानाही सव्वा वर्ष उलटून संशयित आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आलेले नाही. आता उच्च न्यायालयाने जमिनींच्या व्यवहारांना नियमित करण्यास अनुमती दिल्यामुळे या संदर्भात दाखल संपूर्ण गुन्ह्यावरच त्याचा परिणाम होणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय