वृद्धाच्या हत्येमागे भूखंडमाफियांचा हात असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:02+5:302021-02-23T04:23:02+5:30

आनंदवली येथील एका शेतामध्ये राहणारे रमेश वाळू मंडलिक (७०) यांना धारधार शस्राने बुधवारी (दि.१७) संध्याकाळच्या सुमारास काही संशयितांनी मिळून ...

Land mafia is suspected to be behind the murder of the old man | वृद्धाच्या हत्येमागे भूखंडमाफियांचा हात असल्याचा संशय

वृद्धाच्या हत्येमागे भूखंडमाफियांचा हात असल्याचा संशय

Next

आनंदवली येथील एका शेतामध्ये राहणारे रमेश वाळू मंडलिक (७०) यांना धारधार शस्राने बुधवारी (दि.१७) संध्याकाळच्या सुमारास काही संशयितांनी मिळून गळ्यावर वार करून ठार मारले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी गंभीर दखल घेत फिर्यादी विशाल मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी संशयित रम्मी राजपूत, मुक्ता मोटकरी यांच्यासह आणखी एक संशयितांचा पोलीस शोध घेत आहे. या गुन्ह्याचा गंगापूर पोलिसांसह गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास केला जात आहे. दरम्यान, पाण्डेय यांनी सोमवारी (दि.२२) संध्याकाळी गंगापूर पोलीस ठाण्यात भेट देत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासाला योग्य दिशा आणि गती देण्याबाबत त्यांनी विविध सूचनाही यावेळी केल्या. या गुन्ह्यातील संशयितांमागे कोणत्याही राजकीय पक्षाचा वरदहस्त जरी असल्याची चर्चा होत असली तरीदेखील त्याचा पोलिसांच्या तपासावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण कायदा हा सर्वांना समान असून एका वृद्ध व्यक्तीचा खून करण्याचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडला आहे. यामुळे या गुन्ह्याचा सखोल तपास करून सर्व संशयितांना ताब्यात घेणे हे पोलिसांचे प्रथम लक्ष्य असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. बैठकीला उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त दीपाल खन्ना, मोहन ठाकूर, पोलीस निरिक्षक अंचल मुदगल आदी उपस्थित होते.

---इन्फो--

आज घटनास्थळी भेट देणार

खुनाच्या गुन्ह्याचा तपास सांघिकरीत्या शहर पोलिसांकडून केला जात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत असून मी स्वत: या गुन्ह्याच्या तपासात लक्ष घातले आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पोलीस यंत्रणा करत आहे. लवकरच पोलिसांच्या प्रयत्नांना यश येईल आणि या वृध्दाच्या खुनाचा उलगडा होईल, असा आशावाद पाण्डेय यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.२३) पाण्डेय आनंदवली येथील घटनास्थळी भेट देणार आहे.

---

फोटो- २२पीएचएफबी७८

===Photopath===

220221\22nsk_44_22022021_13.jpg

===Caption===

बैठकीच चर्चा करताना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय. 

Web Title: Land mafia is suspected to be behind the murder of the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.