शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या जमिनीचा होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:07 IST

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी धडक वसूली मोहीम हाती घेतली असून, नाशिक तालुक्यातील ...

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बॅँक : कर्ज वसुलीसाठी अटीतटीचे प्रयत्न

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी धडक वसूली मोहीम हाती घेतली असून, नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील २८ थकबाकीदारांच्या सुमारे ४० एकर क्षेत्राचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. तसेच शिलापूर येथील माधव रामचंद्र कहांडळ यांच्याकडे दोन लाख ६६ हजारांची थकबाकी आहे. १९९७ पासून थकबाकीदार असलेले कहांडळ यांच्या ५ एकर ११ गुंठे जागेचाही लिलाव करण्याचे जाहीर केले आहे.जिल्हा बँकेनी मार्च महिन्यात सक्तीची वसुली मोहीम राबविण्यासाठी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. बँकेच्या थकबाकीदार असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्यांमुळे बँक एनपीएत गेली. निफाड कारखान्याकडे १४० कोटींची थकबाकी आहे. या वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. तसेच कारखान्याच्या माजी संचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. बँकेने वसुलीसाठी जप्त करण्यात आलेला कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्या. एकदा नव्हे तर तीनदा निविदा काढल्या. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बँकेने निसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढली. मात्र, भाडेतत्त्वाची रक्कम जादा असल्याकारणाने भाडेतत्त्वावर घेण्यास कोणीही धजावले नाही. पयार्याने हा प्रयत्न फसला. बँकेची धडक वसुली मोहीम सुरू आहे. यात बँकेने पुन्हा थकबाकीदार असलेल्या कारखान्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या मोहिमेंतर्गत शीलापूर येथील कहांडळ यांची पाच एकर जमिनीचा लिलाव केला जाणार आहे. तसेच सय्यद पिंप्री येथील २८ थकबाकीदारांकडे ५४ लाख ६२ हजारांची थकबाकी आहे. त्यांना सात दिवसांची नोटीस बजावण्यात आली असून, त्यानंतर थकबाकीदारांनी थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या जमिनीचा लिलाव केला जाणार आहे.३० दिवसांची अंतिम मुदत जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे ठरविले असून, त्याद्वारे थकबाकीदारांना रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची अंतिम मुदत दिली जाणार आहे. या थकबाकीदारांनी बँकेचे कर्ज न भरल्यास थेट त्यांच्या जमिनीचा जाहीर लिलाव करून ही रक्कम वसूल केली जाईल. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया बॅँकेने सुरू केली आहे.