शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जदार शेतक-यांच्या जमिनीचा लिलाव पाडला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 16:39 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्लाबोल : जिल्हा बॅँकेचे पथक फिरले माघारी

ठळक मुद्देसकाळपासूनच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लासलगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेत येऊन बसल्याने वसुली पथकाची अडचण झाली

लासलगाव : सरकारने दुष्काळी परिस्थितीत कुठलीही वसुली करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले असताना देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लासलगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत हल्लाबोल करत बँकेने आयोजित केलेली जमिनीची लिलाव प्रक्रि या बंद पाडली.याबाबत सविस्तर माहिती अशी, की मरळगोई येथील शेतकरी सुखदेव फकिरा जगताप यांनी १९ लाख रु पये व पंढरीनाथ फकिरा जगताप यांनी १३ लाख रु पये कर्ज जिल्हा बॅँकेकडून घेतले होते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन नापिक झाल्याने कुठल्याही प्रकारचे शेतमालाचे उत्पादन शेतक-यांना घेता येत नाही. त्यातच थोड्याफार उत्पादित शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा स्थितीत शासनाने दुष्काळी स्थितीत कर्जाची वसुली न करण्याचे निर्देश बॅँकांना दिले आहेत. मात्र, गुरु वारी (दि.२७) जिल्हा बँकेचे वसुली पथक कर्जदार शेतक-यांच्या जमिनींचा लिलाव करण्यासाठी नाशिकवरून लासलगावी आले होते. या वेळी लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे देखील उपस्थित होते. मात्र सकाळपासूनच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लासलगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेत येऊन बसल्याने वसुली पथकाची अडचण झाली. पदाधिकारी,शेतक-यांनी या वेळी अधिक-यांना घेराव घातला व लिलाव प्रक्रियेस कडाडून विरोध केला. या वेळी जिल्हा बँकेच्या अधिका-यांना जाब विचारत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने पथकाला लिलाव प्रक्रि या थांबवावी लागली.या वेळी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा निर्मला जगझाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हंसराज वडघुले, साहेबराव मोरे, नाना बच्छाव, सुधाकर मोगल, सोमनाथ बोराडे, भाऊसाहेब तासकर, संजय पाटोळे, निवृत्ती गारे, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तू बोङके,नाशिक जिल्हा अध्यक्ष अनिल भझंगे, युवा जिल्हा प्रमुख जगन काकडे, शाम गोसावी तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक