शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

लमाण समाजाचे ‘हातोडा’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:20 IST

पारंपरिक खडी फोडण्याचा व्यवसाय करणाऱ्या लमाण समाजावर उपासमारीची वेळ आल्याने या समाजाची शासन दरबारी नोंद व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी छावा लभान क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात ‘हातोडा’ घेऊन निदर्शने केली.

नाशिक : पारंपरिक खडी फोडण्याचा व्यवसाय करणाऱ्या लमाण समाजावर उपासमारीची वेळ आल्याने या समाजाची शासन दरबारी नोंद व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी छावा लभान क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात ‘हातोडा’ घेऊन निदर्शने केली.  दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, लमाण समाज रोजगारासाठी कायम भटकंती करीत असल्यामुळे त्याला शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. उलट तंत्रज्ञानामुळे त्यांच्या रोजगारावर गदा आली असून, सरकारने हातफोड खडी बंद केल्यामुळे रस्त्यासाठी लागणारी हातफोड खडीचे काम बंद झाले त्याऐवजी क्रशरची खडी वापरली जात आहे. त्यामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.या आंदोलनात मुकेश माळी, सुभाष जाधव, नथाराम नवले आदी सहभागी झाले होते.  या समाजाची शासन दरबारी नोंद होऊन पारंपरिक व्यवसाय हातफोड खडी व्यवसायाची नोंद व्हावी, लमाण समाजाच्या लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा जेणे करून त्यांचे कुटुंब स्थिर होऊन मुलांना शिक्षण मिळेल. लमाण समाजाच्या भूमिहीन कुटुंबीयांना पाच एकर जमीन कसण्यासाठी मिळावी, लमाण समाजाला एस. टी. प्रवर्गात समाविष्ट करावे, जातीच्या दाखल्यासाठी लागणारा १९६१ चा पुरावा रद्द करावा आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक