शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:49 IST

महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीचे गाळे लिलाव करताना ३३१ ठिकाणचे लिलाव तहकूब करण्यात आले असले तरी १३९ गाळ्यांच्या लिलावातूनच चार लाख रुपयांचे उत्पन्न वाढले आहे. गेल्यावर्षी महापालिकेला २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर यंदा २९ लाख १४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मनपाला दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीचे गाळे लिलाव करताना ३३१ ठिकाणचे लिलाव तहकूब करण्यात आले असले तरी १३९ गाळ्यांच्या लिलावातूनच चार लाख रुपयांचे उत्पन्न वाढले आहे. गेल्यावर्षी महापालिकेला २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर यंदा २९ लाख १४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मनपाला दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे.  महापालिकेच्या वतीने दरवर्षी फटाके विक्रीसाठी जागा निश्चित केल्या जातात. यंदा महापालिकेने २७ ठिकाणी जागा निश्चित केल्या होत्या. त्यातील ७० गाळ्यांना पोलिसांनी हरकत घेतल्याने लिलावच होऊ शकले नाहीत, तर उर्वरित ४७० गाळ्यांचे लिलाव करताना फक्त १३९ गाळ्यांचेच लिलाव झाले. त्यातून महापालिकेला २९ लाख १४ हजार ७०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी महापालिकेने ३८९ गाळ्यांचे लिलाव केले त्यातील २७६ गाळ्यांनाच प्रतिसाद मिळाला. त्या माध्यमातून महापालिकेला २५ लाख २५ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत चार लाखांनी उत्पन्न वाढले आहे.  अर्थात महापालिकेच्या वतीने ४७० गाळ्यांचे लिलाव करताना सरकारी दरानुसार महापालिकेला ७२ लाख ८४ हजार ७०० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र २९ लाख रुपयांचेच उत्पन्न मिळाले आहे.प्रतिसाद नाहीमहापालिकेच्या वतीने यंदा फटाक्यांच्या गाळ्यांसाठी चांगल्या जागा निवडण्यात आल्या होत्या, मात्र त्यापैकी ७० जागांवर पोलीस प्रशासनाने फुली मारली काही गाळ्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अन्यथा उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता होती, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका