शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शहरातील बाजारात अवतरली ‘लक्ष्मी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:03 IST

ऐन दिवाळीच्या काळातच शहरात पावसाने लावलेली हजेरी व त्यामुळे ओस पडलेल्या बाजारपेठेत रविवारी पावसाने उघडीप दिल्याने बाजारात नवचैत्यन्य निर्माण झाले होते. बाजारात दाखल झालेल्या विविध वस्तु, कपडे, रेडीमेड फराळ, मिठाई, फटाके खरेदीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहकांची मोठी झुंबड बघायला मिळाली.

नाशिक : ऐन दिवाळीच्या काळातच शहरात पावसाने लावलेली हजेरी व त्यामुळे ओस पडलेल्या बाजारपेठेत रविवारी पावसाने उघडीप दिल्याने बाजारात नवचैत्यन्य निर्माण झाले होते. बाजारात दाखल झालेल्या विविध वस्तु, कपडे, रेडीमेड फराळ, मिठाई, फटाके खरेदीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहकांची मोठी झुंबड बघायला मिळाली. त्यामुळे शांत पडलेल्या बाजारपेठात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ‘लक्ष्मी’ अवतरल्याचे चित्र दिसत होते.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे साहित्य दाखल झाले होते, मात्र शहरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांचा मोठा हिरमोड झाला होता. बाजारपेठेत हवी तशी गर्दी व खरेदी होत नसल्याने विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दिवाळीसाठी विविध वस्तू बाजारांत येऊन सुद्धा पावसामुळे ग्राहकांनी काही प्रमाणात पाठ फिरविल्याचे दिसत होते. त्यामुळे पाऊस केव्हा उघडीप देईल याच प्रतीक्षेत सर्व जण होते. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने बाजारात एकप्रकारचे नवचैतन्य निर्माण झाले होते.शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, गंगापूररोड, त्रिमूर्ती चौक, नाशिकरोड तसेच सर्वच भागांतील मार्केटमध्ये रविवारी मोठी गर्दी बघायला मिळाली. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विक्रेत्यांनी दिलेल्या आॅफर्स, मॉलमध्या बॅँडतर्फे दिलेली सूट, फर्निचर खरेदी, तसेच कपडे, वाहने, इलेट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीने यादिवशी बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. यामुळे विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळाले.कपड्यांच्या खरेदीत लक्षणीय वाढदिवाळी म्हटल की नवीन कपडे खरेदी ही हमखास होणारच. मात्र पावसामुळे खरेदीच्या मंदावलेल्या उत्साहाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झळाळी मिळाली. शहरातील सगळ्याच बाजारपेठांसह मॉल्समध्येही कपडे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. यामुळे कपड्यांच्या मार्केटमध्ये मोठी उलाढाल झाली.मिठाई, गिफ्टला पसंतीदिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ, मिठाई, गिफ्ट्सना या दिवसांत मोठी मागणी असती. यावर्षी महिलांनी रेडिमेड फराळाला मोठी पसंती दिली आहे. वेळेच्या अभावामुळे महिलांचा याकडे मोठा कल दिसून आला. तसेच दिवाळीची भेट देण्यासाठी आक र्षक मिठाई व गिफ्ट्सच्या बॉक्सच्या विक्रीतही यादिवशी मोठी वाढ झाली. त्यामुळे शहरातील सर्वच मिठाई दुकानांवर ग्राहकांची झुंबड बघायला मिळाली.वाहनबाजारात तेजीप्रत्येक सणाला वाहन खरेदीला उत्साह वाढतो. त्यात दिवाळी म्हणजे सणांचा राजा.. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील सर्वच वाहन शो रुममध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळाली. तसेच अनेकांनी आपले नवीन वाहन काही दिवस आधीच बुक करून ठेवले होते. तसेच वाहनांच्या अ‍ॅडव्हॉन्स बुकिंगमुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकांना आपले आवडते वाहन मिळाले नाही.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार