नाशिक : बँकेच्या एटीएमसमोर लावलेल्या कारमधून एक लाख रुपये चोरून नेल्याची घटना सोमवारी दुपारी महात्मानगर परिसरात घडली़ नागपूर येथील मोहम्मद अश्रम शेख (२६) हे सोमवारी दुपारी महात्मानगर रोडवरील अॅक्सिस बँकेच्या एटीएमसमोर आपली आॅडी कार (एमएच २९, एएच ७८६०) लावून कामासाठी गेले़ या कारच्या मागील सिटच्या पॉकेटमध्ये पैशांची बॅग ठेवलेली होती़ शेख काम आटोपून कारजवळ आले असता त्यांना कॅश बॅगमधील एक लाख रुपये चोरी झाल्याचे लक्षात आले़ त्यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाणे गाठून चोरीची फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)
कारमधील एक लाख रुपये लंपास
By admin | Updated: March 18, 2015 00:21 IST