शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:21 IST

शहरात घरफोडीसत्र सुरूच असून, आडगाव व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तसेच कडी-कोयंडा तोडून केलेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने तसेच लॅपटॉप असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला आहे़

नाशिक : शहरात घरफोडीसत्र सुरूच असून, आडगाव व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तसेच कडी-कोयंडा तोडून केलेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने तसेच लॅपटॉप असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला आहे़घरफोडीची पहिली घटना धात्रक फाटा परिसरात गुरुवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली़ साकार पार्थ अपार्टमेंटमधील संदीप भामरे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी बारा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ६ ग्रॅम कानातल्या रिंगा असा ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घटना महात्मानगरमधील पार्क अव्हेन्यू येथे घडली़ किशोर तुकाराम नंदेश्वर (२९, रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २९ आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत ते कामानिमित्त बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला ़तसेच घरातील दोन मोबाइल फोन, लॅपटॉप, आयपॅड असा २८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़