शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:41 IST

श्रावणसरी अंगावर झेलत पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाले. त्र्यंबकराजाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.

त्र्यंबकेश्वर : श्रावणसरी अंगावर झेलत पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाले. त्र्यंबकराजाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.  श्रावणातील पहिला सोमवार असल्याने रात्रीपासूनच भाविकांनी प्रदक्षिणेला जाण्यासाठी शहरात गर्दी केली होती.  त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ आदींसह काही भाविक ब्रह्मगिरीवरही जात होते. कुशावर्तावर भाविकांची गर्दी होती. भाविकांची गर्दी लक्षात घेता दोन दिवसांत कुशावर्तचे तीर्थ उपसून स्वच्छ करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनबारी बाहेर भर पावसात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. देणगी दर्शनासाठीदेखील भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेलेली संत निवृत्तिनाथांची पालखी सोमवारी शहरात दाखल झाली. निवृत्तिनाथ व त्र्यंबकराजाच्या भेटीचा सोहळा रंगला.नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारपासूनज पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डीवायएसपी सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिवहन महामंडळातर्फे हवी तेव्हा बस मिनिटाला सोडली जात होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही. उपजिल्हा रु ग्णालयात पुरेशा औषधसाठ्यासह वैद्यकीय अधिकारी तत्पर होते. पालिकेने स्वच्छतेची काळजी घेऊन साफसफाई ठेवली होती. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर , उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, गटनेते समीर पाटणकर यांच्यासह मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरु रे, आरोग्य सभापती विष्णू दोबाडे गर्दीवर लक्ष ठेवून होते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर