शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षापासून लखमापूर गावाला पोलीसपाटीलच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:04 IST

लखमापूर : गाव तेथे पोलीसपाटील हे शासनाचे धोरण असताना दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गाव या योजनेतून दूर राहिले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून गावाला पोलीस पाटीलच नसल्याने गावचा कारभार पोलीसपाटलांविनाच होत आहे.

ठळक मुद्देतंटा मुक्तीसाठी पोलीसपाटील यांची भुमीका महत्त्वाची

लखमापूर : गाव तेथे पोलीसपाटील हे शासनाचे धोरण असताना दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गाव या योजनेतून दूर राहिले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून गावाला पोलीस पाटीलच नसल्याने गावचा कारभार पोलीसपाटलांविनाच होत आहे.दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे गाव तालुक्यात औद्योगिक क्षेत्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. परंतु गावाला हक्काचे पोलिसपाटील नसल्याने विविध दाखल्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. तेव्हा या गावाला हक्काचे पोलिस पाटील केव्हा मिळणार. अशी मागणी सध्या जोर धरीत आहे. प्राचीन काळापासून गावाचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी कायद्याची माहिती असलेल्या धाडसी व्यक्ती महत्त्व म्हणजे गावचे पोलीसपाटील त्यामुळे गावगाडा चालवत असताना न्याय पूर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील हे नावारु पाला आलेली आहेत. पोलीसपाटील पदाचा इतिहास हा काही कायदा कलमानुसार अधिनियमीत आहे. पहिला कायदा 1867 साली मुंबई ग्राम पोलीस अधिनियम या नावाने अमलात आणला. या कायद्याच्या तरतुदीनुसार पोलीस पाटील पद हे वंशपरंपरागत होते. त्याकाळी ते गावातील न्यायनिवाडा पासून ते महसूल गोळा करण्या पर्यंतची सर्व कामे पाटील करायचे. परंतु 15आॅगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांची नेमलेली वंशपरंपरागत पाटीलकी पदे रद्द करण्यात आली. त्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1962 पासून ही वंशपरंपरागत पध्दती ख-या अर्थाने रद्द करावी ही मागणी होती. पोलीसपाटील पदाला खरी राजमुद्रीत मान्यता17 डिसेंबर 1967 रोजी मिळाली.पोलीसपाटलांची गावासाठीची भूमिकाही महत्त्वाची मानली जाते. गावात जर काही, भांडणे, तंटे, विविध स्वरु पाचे वाद विवाद, शेती विषयक भांडणे इ.गाव पातळीवर मिटविण्यासाठी योग्य न्याय निवडा देण्याचे काम त्या त्या गावाचे पोलीसपाटील हे करीत होते. गावातील तंटा मुक्तीसाठी पोलीसपाटील यांची भुमीका महत्त्वाची मानली जाते.नाशिक जिल्ह्यात 1680 पोलीसपाटील विविध गावात कार्यरत आहेत. अजून 300 ते 350 पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. तसेच दिंडोरी तालुक्यात सध्या 132 पोलीसपाटील असून 25 पदे रिक्त आहेत. लखमापूर गावात साधारणपणे 15 वर्षांपासून पोलीसपाटील पद रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्गास व इतर नागरिकांना जर पोलीसपाटीलांचा दाखला लागत असल्यास ते मिळविणे अवघड होऊन जाते. तेव्हा लखमापूर गावासाठी स्थानिक कायम स्वरूपी पोलीसपाटील यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.पोलीसपाटील पद ज्या गावात रिक्त आहेत, ते लवकर भरण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. कारण गावाचा व शासनाचा मुख्य आधार असतो. त्यासाठी आम्ही आताच काही शासनाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या या संदर्भात भेटी घेऊन, याबाबतीत चर्चा केली आहे. दिंडोरी तालुक्यात ज्या गावांमध्ये पोलीसपाटील नाही. त्या गावामध्ये शासनाच्या आदेशाने ते पद नेमणूकीसाठी आम्ही प्रयत्नशील आहेत.- चिंतामण पाटील, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पोलीसपाटील संघटना

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेgram panchayatग्राम पंचायत