औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला बचतगटाचे उपहारगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:43 PM2019-12-27T23:43:01+5:302019-12-27T23:43:24+5:30

सुरगाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला बचतगटाच्या माध्यमातून उपहारगृह सुरू करण्यात आले असून या उपहारगृहाचे उद्घाटन महिला बचतगटांचे व्यवस्थापक व संस्थेचे प्राचार्य यांचे हस्ते करण्यात आले.

Ladies' savings group in the Industrial Training Institute | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला बचतगटाचे उपहारगृह

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपहारगृहाच्या उद्घाटनप्रसंगी राजेंद्र चौधरी, के. एन. एस. शेख, शैला सोनवणे, रोहिणी सूर्यवंशी, ललिता पिंगळे, सुनीता पाटोळे, रूपाली खैरनार, कविता तिडके, प्रीती खैरनार आदी.

Next

सुरगाणा : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला बचतगटाच्या माध्यमातून उपहारगृह सुरू करण्यात आले असून या उपहारगृहाचे उद्घाटन महिला बचतगटांचे व्यवस्थापक व संस्थेचे प्राचार्य यांचे हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक महामंडळ नाशिक विभागातील तेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्र मांतर्गत श्रीशक्ती लोकसंचलित साधन केंद्र कार्यक्षेत्रातील येथील स्वयंसिद्ध महिला बचतगटाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपहारगृह सुरू केले असून, या उपहारगृहाचे उद्घाटन महिला बचतगटांचे व्यवस्थापक राजेंद्र चौधरी व संस्थेचे प्राचार्य के.एन.एस.शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपहारगृह चालविण्यासाठी संधी उपलब्ध झाल्याने स्वयंसिद्ध बचतगटातील महिलांना स्वयंरोजगार प्राप्त होऊन स्वताला स्वयंसिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थी, शिक्षक वृंद, कर्मचारी आदींना चहा, नाश्ता, जेवण या उपहारगृहातून मिळणार आहे.

Web Title: Ladies' savings group in the Industrial Training Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.