नाशिक : बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उपनगर परिसरातील निसर्गोपचार केंद्रासमोरील स्नेहल पार्कमध्ये दुपारच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हितेश बलवीरराय नय्यर (रा. स्नेहलपार्क, निसर्गोपचार केंद्रासमोर, जयभवानीरोड, उपनगर) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी शनिवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास घरात प्रवेश केला़ त्यानंतर त्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असे ७७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व २३ हजार रुपयांची रोकड असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नय्यर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
उपनगरला घरफोडीत एक लाखाचा ऐवज लंपास
By admin | Updated: August 18, 2016 00:38 IST