शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:42 IST

मालेगाव:  शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मालेगाव रेड झोनमध्ये असल्याने सर्वांचेच लक्ष या शहराकडे लागून आहे.

मालेगाव (शफीक शेख) शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मालेगाव रेड झोनमध्ये असल्याने सर्वांचेच लक्ष या शहराकडे लागून आहे. मालेगावात मोठ्या संख्येने बिहार, उत्तर प्रदेशातील यंत्रमाग मजूर असून, यंत्रमाग बंद असल्याने लॉकडाउनमुळे शहरात अडकून पडलेल्या मजुरांची उपासमार होत असल्याने अनेक मजूर पायी आपल्या गावाकडे गेले तर काही मजुरांना प्रशासनाने रोखून धरले आहे.मालेगाव शहरात स्थलांतरित २१ मजूर आहेत. प्रशासनाने सर्व स्थलांतरित २१ मजुरांना कॉरण्टाइन केले असून, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था मुंबई - आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा भागात असलेल्या जाट मंगल कार्यालयात केली आहे. तेथे सर्व स्थलांतरित मजुरांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजुरांना रोज सकाळी चहा, नास्ता आणि दोन वेळचे जेवण दिले जात आहे. शिवाय सुरळीतपणे पाणीपुरवठादेखील केला जात आहे. मालेगावात असणारे सर्व २१ स्थलांतरित मजूर हे पुण्याहून मुंबईकडेजात होते. महसूल प्रशासनाने त्यांना अडवून कॉरण्टाइन केले आहे.मालेगावात निवासास असलेले सर्व मजूर मध्य प्रदेशातील छत्तरपूर गावातील रहिवासी आहेत. गेल्या सुमारे २० दिवसांपासून सर्व मजूर मालेगावात अडकून पडले असून, त्यांना त्यांच्या गावी जायची ओढ लागली आहे. शासनाने इतर मजुरांप्रमाणेच आपल्यालादेखील आपल्या राज्यात आपल्या घरी पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत प्रशासनाने केलेली नाही यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही.

गुगुळवाडच्या मजुरांचा प्रशासनावर आरोपमालेगाव तालुक्यातील ८७ ऊसतोड मजूर सुमारे दीड महिन्यापासून गुजरात राज्यात अडकले होते. दोन दिवसांपूर्वीच ते गुगुळवाड ला परतले असून ग्रामस्थांनी त्यांना धान्य किराणा यांची मदत करून जंगलातच कोरेन्टाईन करण्यात आले आहे.प्रशासनाने आम्हाला गुजरात मधून आणताना आणि आल्यानंतर कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप केल्याचे माजी सरपंच आर. डी. निकम यांनी केला आहे.------------------------------------मंगल कार्यालयात व्यवस्थामालेगाव शहरापासून सुमारे ६ कि.मी. अंतरावर मध्य प्रदेशातील स्थलांतरित मजुरांना ठेवण्यात आले आहे. जाट मंगल कार्यालयात त्यांना दोन वेळच्या जेवणाची जरी व्यवस्था करण्यात आली असली तरी त्यांना इतर जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. लहान मुलांना सांभाळताना या मजुरांना सर्कस करावी लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक