शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लाखो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:53 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले आहे. अधिकाºयांच्या पाठबळाने हा प्रकार झाल्याचा आरोप दोडीच्या पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी केला आहे. तर अधिकाºयांनी आरोपांचे खंडन करताना थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : चारीची क्षमता लक्षात न घेता प्रवाह पद्धतीने पाणी सोडलेडाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले आहे. अधिकाºयांच्या पाठबळाने हा प्रकार झाल्याचा आरोप दोडीच्या पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी केला आहे. तर अधिकाºयांनी आरोपांचे खंडन करताना थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.दोडी शिवारात सोमवारी रात्री ९ ला जेसीबीच्या सहाय्याने डाव्या कालव्यावरील चारी क्र मांक १ , २, व ३ चे पाणी बंद करण्यात आले. प्रवाही पध्दतीने पाणी देण्याचे ठरलेले नसताना चारी क्र मांक ४ मधून क्षमतेपेक्षा अधिक पाणी माळवाडीच्या दिशेने सोडण्यात आले.रात्री अंधारात घडलेला प्रकार पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आला. पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी गणपत केदार, के. पी. आव्हाड, विष्णू साबळे, शंकर केदार, रामनाथ आव्हाड, रोहीत आव्हाड, शरद केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षमतेपेक्षा जास्त पाणी प्रवाहीत केल्याने चारीतून दोन्ही बाजूला पाणी उफाळून शेतात साचले. त्यामुळे शेतकºयांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. पाणी उफाळून भराव्याची माती वाहून गेल्याने तीन ठिकाणी माती खचली आहे.डाव्या कालव्यावरील पाच पाणी वापर संस्थांना लागणारे पाणी पूर्ण झाले होते. धरणातील उरलेल्या सिंचन पाण्याचे दुसºया आवर्तनासाठी नियोजन सुरु होते. त्यातच प्रवाही पाणी देण्याचा बेकायदा प्रकार घडल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला आहे. कारभारी शिंदे, भागवत घुगे, पाराजी शिंदे, शंकरराव केदार, सोपान आव्हाड, रामनाथ आव्हाड, शरद केदार, रमेश उगले आदींनी क्षेत्राबाहेर पाणी विकण्याचा आरोप अधिकाºयांवर केला आहे. गैरप्रकार बंद न झाल्यास पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.धरणात सिंचनाचे ३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. पाणी वापर संस्थांचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे प्रवाही पध्दतीने पाणी सोडले होते. सिंचनाचे पाणी बंद केले आहे.- एस. एस. गोंदकर, उपअभियंता, पाटबंधारे विभाग सिंचनासाठी नसलेल्या ठिकाणी पाणी सोडण्यात आले. हा प्रकार अधिकाºयांच्या संगमताने झाला असून पाण्याची विक्र ी करण्यात आली. समितीच्या बैठकीत प्रवाही पाणी देण्याबाबत काहीही ठरले नव्हते. पाणी नासाडी संदर्भात जिल्हाधिकारी, आमदार, पाटबंधारे विभाग यांना निवेदन देणार आहे.- गणपत केदार, अध्यक्ष, रेणुका पाणी वापर संस्था दोडी.