शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

निधीची कमतरता : तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज

By admin | Updated: May 22, 2016 23:49 IST

मांजरपाडा प्रकल्पापुढे अडचणींचा डोंगर

येवलादुष्काळी येवला तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या मांजरपाडा-१ प्रकल्पाचे काम सध्या ठप्प झाले आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने ४५४ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता न दिल्याने व मागील शासनाने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटींचे अनुदान प्रशासकीय मान्यतेअभावी अखर्चित राहिल्याने व त्यातीलच २८ कोटींचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पांसाठी वळविल्याने मांजरपाडा १ चा प्रकल्प कधी पूर्ण होणार व येवल्याची तहान कधी भागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.कदाचित या प्रश्नांवर येवले तालुक्यातील जनतेला रस्त्यावर उतरून निधी पदरात पडून घ्यावा लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१४-१५च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे. शिवाय आता सत्तेत असणारे मांजरपाडा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असे म्हणून तत्कालीन परिस्थितीत आघाडी शासनावर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. सत्तेवर आल्यावर मात्र मांजरपाडा बाबत अवाक्षरही बोलत नाहीत. मांजरपाडाबाबत केवळ राजकारण न करता श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवून युती शासनाने या प्रकल्पाची पूर्तता करावी, अशी मागणी तालुका करीत आहे. जलसंपदामंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मांजरपाडा १ वळण योजनेबद्दल सोईस्कर मौन बाळगले आहे.आमदार भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटीतून हा प्रश्न मांडला होता. विधिमंडळातही अनेकवेळा प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. परंतु शासनाने तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यास टाळाटाळ केली आहे. शासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे योजनेचा खर्च अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा मांजरपाडा १ हा पहिलाच प्रयोग असून, १४५ कोटी रुपये आजवर खर्च झाला असून, पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्याने काम रेंगाळले आहे. मांजरपाडा वळण योजनेचे सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय ६०६ दलघफू पाणी गोदावरी खोऱ्यात येणार नाही. अर्थातच ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून निघणार नाही. मांजरपाड्याचे पुणेगाव धरणमार्गे डोंगरगावपर्यंत, येवल्यात पाणी कधी येणार, असा प्रश्न तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. या पाण्यातून येवला तालुक्यातील ३५ ल.पा.बंधारे भरून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पुणेगाव ते डोंगरगाव पोहोच कालव्याचे कामही झाले आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम व्हावे, अशी अपेक्षा उत्तरपूर्व भागातील शेतकऱ्यांची व्यक्त केली आहे. दुष्काळी येवला तालुक्याला पुणेगाव धरणातून दरसवाडीमार्गे डोंगरगाव पोहोच कालव्याद्वारे पाणी हवे असल्यास तालुक्यातील सध्या सुस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मरगळ झटकून सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याची गरज आहे.