शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कायझेन स्पर्धकांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:22 IST

सीआयआयच्या वतीने नाशिकला घेण्यात आलेल्या १४व्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेत राज्यातील ७० सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगातील ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या पाच गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सातपूर : सीआयआयच्या वतीने नाशिकला घेण्यात आलेल्या १४व्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेत राज्यातील ७० सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगातील ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या पाच गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.अंबड औद्योगिक वसाहतीतील नाशिक इंजिनिरिंग क्लस्टरच्या सभागृहात आयोजित १४व्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेचे उद्घाटन सीआयआय उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषदेचे अध्यक्ष तथा एबीबीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत सीआयआय कायझेन अ‍ॅवॉर्ड कमिटीचे अध्यक्ष आणि महिंद्रा आणि महिंद्राचे महाव्यवस्थापक अनिल जंगले यांनी केले. जपानी व्यवस्थापन तत्त्वज्ञान असलेल्या कायझेनचा उपयोग निरंतर वाढत्या बदलांद्वारा गुणवत्ता सुधारण्यासाठी होत असतो.  कायझेन शब्द म्हणजे ‘सतत सुधारणा’ बरेच उद्योग कायझेन तत्त्वज्ञानाचे अनुसरण करतात. प्रत्येक वर्षी कारखान्यांमध्ये कायझेनची ओळख पटविली जाते. त्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो. त्यामुळे उद्योगाच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होण्यास मदत होते, असेही यावेळी सांगण्यात आले. १४ वर्षांपूर्वी ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेत राज्यातील नाशिक, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, अहमदनगर, पुणे, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथील विविध कारखान्यांतील संघ सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक