शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:41 IST

  नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर एक वर्षाआड देण्यात येणाºया ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी (दि. २०) नाशकात पत्रकार परिषदेत केली आहे. यावर्षी गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता ...

ठळक मुद्दे सत्यशील देशपांडे, अमोल पालेकर, सुभाष अवचट यांचा समावेश१० मार्चला वितरण

 

 

नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर एक वर्षाआड देण्यात येणाºया ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी (दि. २०) नाशकात पत्रकार परिषदेत केली आहे. यावर्षी गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि नुकत्याच झालेल्या कमला मिल दुर्घटनेत अडकलेल्यांना जीवदान देणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. येत्या १० मार्चला कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी मविप्रच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.१९९२ पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विविध सहा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे. यंदाचे पुरस्काराचे चौदावे वर्ष आहे. दर एक वर्षाआड या पुरस्काराचे वितरण होते. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी, गायन या प्रकारात गायक, संगीततज्ज्ञ, रचनाकार पंडित सत्यशील देशपांडे, लोकसेवा प्रकारात मेळघाट येथे आदिवासी जमातीत राहून सेवा बजावणारे दाम्पत्य डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, नाट्य आणि चित्रपट प्रकारात मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अमोल पालेकर, ज्ञान या प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्र या प्रकारात आंतरराष्टÑीय ख्यातीचे चित्रकार सुभाष अवचट तसेच मुंबईत नुकत्याच घडलेल्या कमला मिल आगीच्या दुर्घटनेत सुमारे २०० लोकांचा जीव वाचविणारे पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. यापूर्वी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाºया जनस्थान आणि गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा मुंबईत करण्याचा पायंडा विश्वस्तांनी पाडला होता. यंदा मात्र, तात्यासाहेबांच्या गावीच पुरस्कारांची घोषणा करण्याचे उशिराचे भान विश्वस्तांना आले. पत्रकार परिषदेप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त संजय पाटील, आमदार हेमंत टकले, लोकेश शेवडे, विश्वास ठाकूर, विनायक रानडे, अरविंद ओढेकर आदी उपस्थित होते.यंदा थोरात सभागृहात वितरणकुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जनस्थान असो अथवा गोदावरी गौरव या पुरस्कारांचे वितरण महाकवी कालिदास कलामंदिरात समारंभपूर्वक करण्यात येते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कालिदास कलामंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने यंदा कालिदास ऐवजी मविप्र शिक्षण संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता वितरण सोहळा होणार आहे.