शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड साहित्यिक शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: June 7, 2017 00:07 IST

मुक्त विद्यापीठाची घोषणा : १५ जून रोजी होणार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ कन्नड साहित्यिक प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार लातूरच्या मेनका धुमाळे यांना जाहीर करण्यात आला आहे.मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी मंगळवारी पुरस्कारांची घोषणा केली. यंदाचा हा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार असून, एक लाख रु पये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे.डॉ. शिवप्रकाश यांचे इंग्रजी आणि कन्नड या भाषांतील साहित्यात मोठे योगदान आहे. त्यांनी नऊ काव्यसंग्रह संपादित केले असून, पंधरा नाटकांचे लेखन केले आहे. त्यांच्या कवितांचे भारतीय आणि युरोपीय भाषांत अनुवाद, अनेक देशी-विदेशी नियतकालिकांतून साहित्य प्रकाशित झालेले आहे. वाङ्मयीन व नाट्यविषयक चर्चासत्रांचे देशभर आयोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. साहित्य अकादमीच्या ‘इंडियन लिटरेचर’ या नियतकालिकाचे अनेक वर्ष संपादनही केले. देश-विदेशात चर्चासत्रांच्या माध्यमातून कन्नड साहित्याचा प्रचार करण्याचे त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्याचबरोबरच विद्यापीठातर्फे दिला जाणारा २०१६ या वर्षाचा बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार लातूर येथील नवोदित कथा लेखक मेनका बाबुराव धुमाळे यांना त्यांच्या ‘कोरडा पाऊस’ या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. धुमाळे या जिजामाता कन्या प्रशाला, लातूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. येत्या १५ जून रोजी मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीत सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्र मास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.