नाशिक : विवाहाचे सामान घेण्यासाठी जाणार्या दोघांना हटकून त्यांच्यावर हत्त्याराने वार केल्याची घटना नेपाळी कॉर्नरवर शनिवारी दुपारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, खडकाळी येथे राहणारे शकील शाकिर कुरेशी व अफ जल खान इझेक खान हे शनिवारी दुपारी नातेवाइकाच्या विवाहाचे सामान आणण्यासाठी जात होते़ यावेळी संशयित राजू अरुण खैरनार (रा़ देवी मंदिर, चव्हाटा), शांताराम गायकवाड, शेखर परदेशी, चिन्या कोंडीलकर या चौघांनी कुरापत काढून कुरेशी आणि खान यांच्यासोबत वाद निर्माण केला़ यानंतर हत्त्यार व बाटलीने डोके, मान व पाठीवर वार केले़ या प्रकरणी कुरेशी यांनी दिलेल्या फि र्यादीवरून चौघा संशयितांवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे़ (प्रतिनिधी)
कुरापत काढून दोघांवर वार
By admin | Updated: May 26, 2014 00:25 IST