शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोटमगाव : एसएनडी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनकडून परिसर स्वच्छ यात्रेतील स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांनी घेतले हातात झाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:09 IST

तालुक्यातील कोटमगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबामातेची यात्रा भरली असून, येथे लाखो भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे. खाद्यपदार्थांची अनेक दुकाने, हॉटेल येथे लागले असून, परिसरात अस्वच्छता वाढली होती.

येवला : तालुक्यातील कोटमगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबामातेची यात्रा भरली असून, येथे लाखो भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे. खाद्यपदार्थांची अनेक दुकाने, हॉटेल येथे लागले असून, परिसरात अस्वच्छता वाढली होती.विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची जनजागृती केली. ग्रामसेवक सचिन कल्लापुरे, सरपंच नामदेव माळी, सदस्य गणेश लहरे, नवनाथ कोटमे, प्रा. पी. एस. बारवकर, प्रा. एम. एस. देशमुख, प्रा. एस. जी. सावंत, प्रा. एस. एस. दुग्गड आदी उपस्थित होते. प्राचार्य एच. एन. कुदळ, विभागप्रमुख प्रा. व्ही. जी. भामरे यांचे मार्गदर्शन मिळाले. तंत्रनिकेतनच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत स्वच्छता पंधरवडानिमित्त कोटमगाव देवीच्या यात्रेत स्वच्छता मोहीम राबवली. एरवी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडे भली मोठी पुस्तके, साहित्य दिसते; मात्र या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता केली. कोटमगाव ग्रामपंचायतीकडून झाडू, टोपल्या घेऊन संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवली. यात प्लॅस्टिक कचरा, केळीची साले, नारळाच्या शेंड्या व इतर असा ट्रकभर कचरा जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे या उपक्र मास विके्रत्यांनी प्रतिसाद दिला. दुकानदार, भाविकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फीचा आनंद घेतला. सरपंच नामदेव माळी, ग्रामसेवक सचिन कोल्हापुरे यांनी संतोष जनसेवा मित्रमंडळाचे सर्वेसर्वा कुणाल दराडे, विभागप्रमुख सतीश राजनकर, प्रा. संदीप आसूड, प्रा. गणेश गव्हाणे, प्रा. किरण पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रवीण लहरे आदींनी उपक्र माचे नियोजन केले.