नाशिक-पुणे हा लोहमार्ग झाला, तर ही दोन शहरे औद्योगिकदृष्ट्या एकमेकांना जोडली गेल्यास, मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळणार असल्याने, गेल्या काही वर्षांपासून या लोहमार्गासाठी प्रयत्न केले जात होते. केंद्र आणि राज्यशासनाने नुकतीच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड लोहमार्गाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च येणार असून, पैकी राज्य आणि केंद्र शासन प्रत्येकी २० टक्के तर ६० टक्के विविध कंपनींच्या भागभांडवलातून उपलब्ध होणार आहेत. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग उभारणीचे काम सर्वात मोठे असल्याने, सदर काम कुणाला मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. कोकण रेल्वे कंपनीला याचा अनुभव असल्यामुळे नाशिक-पुणे सेमी हायस्पीड लोहमार्ग उभारण्याचे काम आपल्या कंपनीला मिळावे, यासाठी कोकण रेल्वेचे चेअरमन संजय गुप्ता यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे लेखी प्रयत्न सुरू केले आहेत. सदर प्रकल्पाचे काम कमीतकमी खर्चात व वेळेत पूर्ण करणार असल्याची खात्री कंपनीने शासनाला पाठविलेल्या पत्रात नमूद केला आहे.
नाशिक-पुणे हायस्पीडचे काम करण्यास कोकण रेल्वे तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:11 IST