शहरं
Join us  
Trending Stories
1
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
2
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
4
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
5
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
6
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
7
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
8
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
9
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
10
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
11
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
12
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
13
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
14
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
15
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
16
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
17
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
18
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
19
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
20
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

कोकणकडा, घाटघरला दाट धुक्यामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 18:35 IST

भंडारदरा : पर्यटकांना खबरदारीच्या सूचना

ठळक मुद्देनिसरड्या वाटेवरून पाय घसरुन अपघात होण्याची शक्यता

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी-घोटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने धरण क्षेत्रात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येत आहे. त्यातच भंडारदरा धरण परिसरातील धबधबे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहेत. पावसामुळे भंडारदरा परिसरातील कोकणकडा, घाटघर भागात मोठ्या प्रमाणावर धुके दाटून येत असल्याने वाहनचालकांनी उडरावणे येथूनच माघारी फिरावे, असे आवाहन भंडारदरा वन्यजीव विभागाने केले आहे.पावसाच्या संततधारेमुळे इगतपुरीसह भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. वीकेंडला तर गर्दीवर नियंत्रण मिळविणे मुश्किल बनले आहे. विशेषत: पांजरे, नान्हे, नेकलेस, गडईआई धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वन्यजीव विभागाने परिसरातील पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीमार्फत स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शेंडीनाका, मूतखोलनाका येथेही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धबधब्यातील पाणी थेट भंडारदरा धरणात जाऊन पोहोचत असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. अशा स्थितीत पर्यटकांनी धबधब्याजवळ जास्त जाऊ नये. लहान मुलांना सांभाळावे. निसरड्या वाटेवरून पाय घसरुन अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पावसामुळे दरडी कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. पर्यटकांनी वाहने रस्त्याच्या बाजूला लावावीत. जंगलात किंवा कच्च्या रस्त्यांवर वाहने नेऊ नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, कोकणकडा, घाटघर आदी परिसरात धुके दाटून येत असून त्यामुळे वाहनांचे अपघात घडण्याची भीती आहे. अशावेळी वाहनधारकांनी उडरावणे येथूनच माघारी फिरावे, असे वनपरिमंडळ अधिकारी दत्तू ढोन्नर यांनी कळविले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdam tourismधरण पर्यटन