शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोकाटे, हरिश्चंद्र चव्हाणांच्या अर्जांमुळे युतीत अस्वस्थता

By श्याम बागुल | Updated: April 3, 2019 18:21 IST

माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सेना-भाजपाची युती होणार नाही असे गृहीत धरून कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाल्याने कोकाटे यांचा

ठळक मुद्देदोन्ही बंडखोर : नामांकन नेल्याने तर्कवितर्कांना उधाण दोहोंनी अर्ज नेल्यामुळे याचाच अर्थ पक्षनेतृत्व त्यांची समजूत काढण्यास अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : युतीच्या ताब्यात असलेल्या नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी नामांकन दाखल करण्यासाठी समर्थकांकरवी अर्ज नेल्याने युतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या दोहोंनी अर्ज नेल्यामुळे याचाच अर्थ पक्षनेतृत्व त्यांची समजूत काढण्यास अपयशी ठरल्याचा अर्थ काढला जात असून, त्यांची बंडखोरी दोन्ही लोकसभा मतदारसंघांत पक्षाला मारक ठरणार असल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सेना-भाजपाची युती होणार नाही असे गृहीत धरून कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाल्याने कोकाटे यांचा भ्रमनिरास झाला. सेनेने उमेदवारी नाकारली तर मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेल्यामुळे कोकाटे यांनी केलेली तयारी वाया जाऊ नये म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर करून प्रचाराचा नारळही फोडला आहे. सध्या त्यांचा प्रचार सुरू असला तरी, ऐनवेळी पक्ष त्यांची समजूत घालून माघार घेण्यास भाग पाडतील, असे बोलले जात होते. परंतु मंगळवारी कोकाटे यांनी त्यांच्या समर्थकांकरवी नामांकन अर्ज नेला व सदरचा अर्ज भारतीय जनता पक्षासाठी नेल्याची नोंद सरकारी दप्तरात केली आहे. त्यामुळे कोकाटे यांनी बंडखोरी करण्याची पुरेपूर तयारी केल्याचे मानले जात असून, त्यासाठी त्यांनी भाजपाचे नाव घेतल्याने त्यांना पडद्याआड भाजपाची फूस आहे काय असा अर्थ काढला जात आहे. कोकाटे यांची उमेदवारी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी धोकादायक मानली जात आहे. दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतली असली तरी, अपक्ष उमेदवारी करून कोरड्या विहिरीत उडी घेणार नाही, असे जाहीर केल्याने भाजपाला काहीसे हायसे वाटलेले असताना बुधवारी हरिश्चंद्र चव्हाण व त्यांची पत्नी कलावती या दोघांच्या नावे त्यांचे पुत्र समीर यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी नामांकन नेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :nashik-pcनाशिकNashikनाशिकPoliticsराजकारणElectionनिवडणूक