नाशिक : कोजागरी पौर्णिमेनिमित्त विविध मंदिरांमध्ये शनिवारी (दि. १६) विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या भक्तिगीत, भजन व प्रवचनाच्या कार्यक्रमांंमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले. कोजागरी पौर्णिमा म्हणजे जागरूकतेचा, वैभवाचा, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव असल्याची मान्यता असल्याने चंद्राच्या शीतल प्रकाशात शांतता आणि समन्वयाची अनुभूती घेण्यासाठी विविध ठिकाणी कोजागरीच्या जागरणाचे आयोजन करण्यात आले.
कोजागरी पौर्णिमा उत्साहात; विविध धार्मिक कार्यक्रम
By admin | Updated: October 16, 2016 02:22 IST