शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

औद्योगिक वसाहत वायुप्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: November 12, 2016 00:45 IST

धुलीकणांचे प्रमाण जास्त : संकेतस्थळावर महिन्यापूवीर्ची आक डेवारी

नामदेव भोर नाशिकदेशाची राजधानी नवी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असताना नाशिक शहरातही वेगळी स्थिती नाही. नाशिक शहरात दिल्ली एवढी भीषण परिस्थिती नसली तरी औद्योगिक क्षेत्र वायुप्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालले आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ या विषयावर गंभीर नाही. खासगी सूत्रांकडून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण वाढत असल्याचे सांगितले जात असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या दोन महिन्यांची प्रदूषणाची आकडेवारी संकेतस्थळावर अद्ययावत केलेली नाही.प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या परिसरात धुलीकणांचे प्रमाण अधिक असल्याचे काही दिवसांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीतील एसपीएम (सस्पेंड पार्टिकुलेट मॅटर- यात १० मायक्रॉन आणि त्यापेक्षा कमी आकाराच्या धुलीकणांसह मोठ्या धुलीकणांचा समावेश होतो) मोठ्या प्रमाणात वाढले असून संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार वातावरणातील एसपीएमच्या घटकांनी प्रदूषण मापनाच्या प्रत्येकवेळी कमाल मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते. तर रहिवासी परिसरात आॅगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार १० मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या धुलीकणांचे म्हणजे श्वसनातून शरीरात पोहोचणाऱ्या हानिकारक घटकांचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षी आॅगस्ट महिन्यात १६ वेळा वातावरणातील वायुप्रदूषणाची तपासणी करण्यात आली. यात नऊ वेळा वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये वातावरणातील धुलीकणांचे अर्थात आरएसपीएमचे किमान प्रमाण ८८ एम क्युबपर्यंत पोहोचले असून कमाल प्रमाणाने तब्बल १६१ एमक्युबचा टप्पा गाठला आहे. तर हे प्रमाण जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत किमान १४ एमक्युबपर्यंत असेले तरी कमाल प्रमाणाने २८० एमक्युबचा निर्देशांक गाठला होता. या वर्षभरात सुमारे ५५ दिवसांत वायुप्रदूषणातील आरएसपीएम प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. तर केवळ सातपूर औद्योगिक वसाहतीच्या भागात वर्षभरात २१ वेळा धुलीकणांनी मर्यादा ओलांडली होती. सोबतच एसपीएमची मर्यादा सातत्याने नियोजित मर्यादेपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. तर २०१४ वर्षात २२५ वेळा करण्यात आलेल्या प्रदूषण मापनात तब्बल ३२ वेळा आरएसपीएमचे प्रमाण १०० एमक्युपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी शुक्रवारी (दि.११) नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरएसपीएम प्रमाणापेक्षा म्हणजेच १०० एमक्युबपेक्षा तब्बल ३१.७९ एवढे अधिक असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून स्पष्ट होते.याधुलीकणांच्या प्रदूषणांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर गेल्या आॅगस्ट महिन्यांपासून नोंदच होत नसल्याने अधिकाऱ्यांकडून शहरातील प्रदूषणाकडे डोळेझाक होत असल्याचे स्थिती निर्माण झाली आहे.