शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात किरणोत्सव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:12 IST

अनुपम्य सोहळा : गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडीवर अभिषेक

ठळक मुद्देभगवान शंकर व विष्णू यांच्या मिलनाचे प्रतीक असणारे हे गोंदेश्वर मंदिर हेमाडपंथी पंचायतन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे

सिन्नर : येथील बाराव्या शतकातील प्राचीन हेमाडपंथीय गोंदेश्वर मंदिराच्या थेट गाभा-यात सकाळी सूर्य किरणे पोहोचू लागली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून थेट गाभा-यात महादेवाच्या पिंडीवर सूर्याच्या किरणांचा अभिषेक होत असून हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविक सूर्योदयावेळी मंदिरात गर्दी करत आहेत.सिन्नर शहर परिसरात काही प्राचीन मंदिरे आहेत त्यातील बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी उभारलेले गोंदेश्वर मंदिर आहे. भगवान शंकर व विष्णू यांच्या मिलनाचे प्रतीक असणारे हे गोंदेश्वर मंदिर हेमाडपंथी पंचायतन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या संपूर्ण मंदिराची उभारणीच हत्ती शिल्पात झाली आहे. शंकराच्या प्रत्येक मंदिरात नंदी असतोच असतो. मात्र, इथे नंदीला मंदिरात स्थान नसून मंदिराच्या समोर पूर्वेला नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे. शंकराचे मुख्य मंदिर मध्यावर असून त्याच्याभोवती चार उपदिशांना पाच मंदिरे अशी रचना आहे. मंदिरासमोरील नंदीच्या मंदिरानंतर श्रीगणेश, पार्वती, सूर्यदेव व विष्णूचे मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदेवाची एक-दोनच मंदिरे आहेत. त्यातील एक गोंदेश्वराचे मंदिर आहे. वर्षभर सूर्याचे उत्तरायण, दक्षिणायन सुरू असते. जेव्हा सूर्य मध्यावर येतो, तेव्हा सूर्याची किरणे थेट नंदीच्या मंदिरातून गोंदेश्वर मंदिराच्या सभामंडपातील गाभा-याकडे झेपावतात. गाभा-याच्या प्रवेशद्वाराच्या उंब-यावरील शिल्पांना अनोखी चकाकी देत गाभा-यातील पिंडीवर अभिषेक करतात. या पिंडीची सावली समोरच्या भिंतीवर पडते. तीन ते चार मिनिटे सूर्यकिरणांचा हा उत्सव चालतो.

टॅग्स :Nashikनाशिक