शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव-बर्डीपाडा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:40 IST

सुरगाणा : बोरगाव ते बर्डीपाडा या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली असून याचा त्रास वाहनचालकांना होत आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांची कसरत : संबंधित विभागाने दुरुस्ती करण्याची मागणी

सुरगाणा : बोरगाव ते बर्डीपाडा या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली असून याचा त्रास वाहनचालकांना होत आहे.गुजरात राज्याला जोडणारा बोरगाव - सुरगाणा - बर्डीपाडा हा आंतरराज्य महामार्ग आहे. या महामार्गावर दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. या पावसाळ्यात महामार्गावर असंख्य ठिकाणी लहान - मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील चिराई घाट, बुबळी फाटा, तहसिल, लहान भोरमाळ जवळील फरशी पुल, लोळणी ते कोठुळे दरम्यान एकाच ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, म्हैसखडक फाटा जवळील बागुलपाडा, उंबरठाण जवळील फणसपाडा फाटा, वांगणबारी, पांगारणे व तेथून पुढे गुजरात सीमेलगत असलेल्या बर्डीपाडा पर्यंत या महामार्गावर ठिकठिकाणी शेकडो लहान मोठे खड्डे पडले आहेत. दळणवळण करिता दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्याने सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा दिवसरात्र सुरू असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे चालकांना वाहन चालवताना हकनाक त्रास सहन करावा लागत असून यात वाहनांचे नुकसान होत आहे. खड्डे वाचिवण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी न करता चांगल्या दर्जाची डागडुजी करण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिकांनी केली आहे.नवीन व उंच पुल बांधण्याची मागणीलहान भोरमाळ जवळील अपघाती वळणावर असलेला फरशी पुल जूना असल्याने या फरशीपुलाची अवस्था काही वेगळी नाही. गेल्या वेळी या ठिकाणी वरच्या भागात मोठे भगदाड पडून वाहतूक बंद झाली होती. उतार आण िवळण असल्याने या फरशीपुलावर अपघात झाले आहेत. पावसाळ्यात नाल्याला पुर येत असल्याने या फरशीपुलाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधण्याची मागणी केली जात आहे.लोळणी ते कोठुळे दरम्यान महामार्गावर पडलेले मोठे खड्डे. (26सुरगाणा1)

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी