शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जाखोरी शिवरस्त्यावर अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:15 IST

एकलहरे : येथील मातोश्री महाविद्यालयाजवळून हिंगणवेढे शिवमार्गे जाखोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता एकलहरे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतो. वारंवार मागणी करूनही या रस्त्यावरील विद्युतदिवे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. येथील दिवाबत्ती त्वरित सुरू केली नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील विद्युतदिवे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : येथील मातोश्री महाविद्यालयाजवळून हिंगणवेढे शिवमार्गे जाखोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता एकलहरे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतो. वारंवार मागणी करूनही या रस्त्यावरील विद्युतदिवे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. येथील दिवाबत्ती त्वरित सुरू केली नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.हा रस्ता एकलहरे-जाखोरी शिवरस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याच्या दुतर्फा एकलहरे, हिंगणवेढे भागातील मळे वसाहती आहेत. मातोश्री महाविद्यालय परिसरातील रहिवासी, विद्यार्थी यांच्यासह ओढा, एकलहरे, हिंगणवेढे, कोटमगाव, जाखोरी या भागातील नागरिकांचा वावर असतो. या रस्त्याच्या सुरु वातीपासूनच येथे दिवाबत्तीची सोय केलेली नसल्याने रात्री-बेरात्री प्रवास करताना भीती वाटते. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस, द्राक्षे, मका, टमाटे ही पिके उभी असल्याने बिबट्यांना लपण्यास जागा मिळते. रात्री-बेरात्री व दिवसाढवळ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने येथील रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. गेल्याच आठवड्यात ज्ञानेश्वर पवळे यांच्या श्वानास बिबट्याने रात्री आठच्या सुमारास फरफटत नेऊन फस्त केले. सायंकाळनंतर बाहेर फिरणे जिकरीचे झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खर्जुलमळा, पवळे वस्तीतील रहिवाशांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीस लाइट सुरू करण्याबाबत अर्ज, विनंती, निवेदने दिली आहेत. मात्र ग्रामपंचायतीतर्फे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, येथील दिवाबत्ती कामाचा प्रस्ताव मंजूर असून, कोरोनामुळे काम सुरू करता येत नसल्याचे सरपंचांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीजNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका