शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:15 IST

सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात भोजापूर धरणक्षेत्रातील असणाऱ्या सांगळे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या व एक बकरू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

सिन्नर : तालुक्यातील चापडगाव शिवारात भोजापूर धरणक्षेत्रातील असणाऱ्या सांगळे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या व एक बकरू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.धर्मेंद्र विठ्ठल सांगळे यांची भोजापूर धरणालगत डोंगराच्या पायथ्याशी वस्ती आहे. रात्री नेहमीप्रमाणे जनावरे गोठ्यात व शेळ्या घराशेजारच्या शेडमध्ये बांधून ते झोपी गेले होते. मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक शेळ्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने सांगळे यांना जाग आली. कुटुंबातील सदस्यांना झोपेतून उठवत त्यांनी बाहेर धाव घेतली. शेडभोवती असलेला प्लॅस्टिक कागद बिबट्याने फाडून आत प्रवेश केला होता. सांगळे घरातून बाहेर आल्याची चाहूल लागल्याने बिबट्याने शेजारच्या शेतातून डोंगराकडे धाव घेतली. सांगळे कुटुंबीय शेडकडे आले असता दोन गाभण शेळ्या व एका बकराच्या नरडीचा घोट घेऊन बिबट्याने त्यांना ठार मारल्याचे दिसून आले. रात्र जागून काढत या कुटुंबाने आजूबाजूच्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांना सावध केले. सकाळी वनकर्मचारी वसंत आव्हाड यांनी घटनास्थळी पाहणी केली व वरिष्ठांना कळविले.वनविभागाच्या पथकाने पशुवैद्यकीय अधिकाºयांसमवेत मृत जनावरांचा पंचनामा केला. या घटनेत सांगळे यांचे अंदाजे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या वतीने शेतकºयांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सदर परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या